टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:14 PM2018-01-10T22:14:02+5:302018-01-10T22:14:27+5:30

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले.

Eight calves of Leader Tiger in Tippswar Wildlife Sanctuary | टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे

टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे

Next
ठळक मुद्देपांढरकवडा वन्यजीव विभाग : मुकुटबन परिसरातही दोन बछडे वास्तव्याला, १२ मोठ्या वाघांची वर्दळ वेगळीच

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. वाघांची ही वाढती संख्या भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षाची नांदी ठरू शकते. त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजनांची गरज असून सोलर फेनसिंग हा त्यावरील प्रभावी उपाय ठरण्याची शक्यता आहे.
जंगलात आढळणारा पट्टेदार वाघ, हा तेथील वनसंपदा परिपूर्ण असल्याचे द्योतक मानले जाते. सुदैवाने संपूर्ण जग वाघाच्या प्रजातीला वाचविण्यासाठी धडपडत असताना जिल्ह्यातील पांढरकवडा उपवनविभागात १२ पट्टेदार वाघ आहेत. तसेच दहा नवीन पिलसुद्धा जन्माला आली आहे. वाघाला अनुकूल असे वातावरण आहे. यातूनच वाघांची संख्या वाढत असल्याचे मागील काही वर्षात दिसून येत आहे.
शेती करणे झाले कठीण
वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे संचार क्षेत्रही वाढले आहे. टिपेश्वर अभयारण्याबाहेरही वाघांचे वास्तव्य असल्याच्या अनेक खुणा दिसत आहे. मुकुटबन परिसर त्याचप्रमाणे राळेगाव तालुक्यातील सराटी, बंदर येथेही मागील काही दिवसांपासून मानव आणि वाघ, असा संघर्ष पेटला आहे.
सोलर कंपाऊंडचा प्रस्ताव
एकीकडे ‘इकोटुरिझम’चा ओढा वाढत असून कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघ असल्याचा बातम्यांचा प्रसार व प्रचार होत आहे. यातून वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे. अन्न साखळीत शेवटच्या टोकावर असलेला वाघ आणि तृणभक्षक डुकर, रोही, हरीण यांचीही संख्या वाढत असल्याने जंगल भागात शेती करणे कठीण झाले आहे. निसर्गाशी पूरक असलेले वन्यजीव व शेतकरी या दोघांच्याही संघर्षाला टाळण्यासाठी उपाययोजनेची खरी गरज निर्माण झाली आहे.
वाघ-मनुष्य संघर्ष पेटला, शेतकऱ्यांत दहशत
या सुवार्तेसोबतच मनुष्य व वाघ असा संघर्षही पेटला आहे. राळेगाव तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या जंगल परिसरात वाघाने तब्बल ११ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे वाघ वाचवीत असताना मानवाचे संरक्षण, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. जंगल भागाला लागून उदर भरणासाठी शेती करणारा गरीब शेतकरी वाढती वाघाची संख्या संकट समजतो आहे. यातून जनक्षोभही उसळत आहे. अनेकांचा रोजगार हिरावला जात आहे.

वाघाच्या संवर्धनासाठी एनटीसीएकडून दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजना कोणत्या राहतील, अशी विचारणा झाली होती. सोलर फेनसिंग हा उत्तम पर्याय असल्याची मागणी केली आहे.
- डॉ.विराणी
वन्यजीव रक्षक, पांढरकवडा

Web Title: Eight calves of Leader Tiger in Tippswar Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ