शेतकरी भाकरी बांधून कर्जमाफीच्या केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:01 AM2017-09-15T00:01:19+5:302017-09-15T00:02:15+5:30

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे.

Farmer's bread bills at the credit centers | शेतकरी भाकरी बांधून कर्जमाफीच्या केंद्रांवर

शेतकरी भाकरी बांधून कर्जमाफीच्या केंद्रांवर

googlenewsNext
ठळक मुद्देआज शेवटचा दिवस : दिवसभरात दोन लाख अर्ज मार्गी लावण्याचे आव्हान, सर्वच केंद्रांवर स्थिती सारखीच

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे. कर्जमाफीसाठी जिवाच्या आकांताने हे शेतकरी चक्क भाकरी बांधून आॅनलाईन केंद्रांवर धडकत असल्याचे हृदयद्रावक चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येते.
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र अनेक जाचक अटी लादल्या. या अटींमुळे सर्वच शेतकरी त्रस्त आहे. या अटी व अडचणींबाबत विरोधकही मूग गिळून आहे. काही संघटना सतत याविरूद्ध आवाज उठवीतात. मात्र त्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचतच नाही. यामुळे शेतकरी वैतागले. अनेक शेतकºयांनी तर ‘भीक नको पण कुत्रा आवर’, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कर्जमाफीमुळे काही प्रमाणात का होईना आपल्या कुटुंबाला आीर्थक अडचणींतून सोडविण्यास हातभार लागेल, या आशेने अनेक शेतकरी आॅनलाईन केंद्रावर कर्जमाफीची अर्ज भरून देण्यासाठी जात आहे. अनेक अडचणींवर मात करून गेल्या ५० दिवसांत जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र त्यांनाही कर्जमाफी होईल की नाही, याची हुरहुर लागली.
आता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे. शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत एक लाख ७३ हजार शेतकºयांना अर्ज भरायचे आहे. मात्र आॅनलाईन केंद्रांची गती मंदावली आहे. परिणामी शेकडो शेतकरी चक्क भाकरी बांधून या केंद्रांवर पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बळीराजाची अशी अवहेलना आत्तापर्यंत कधीच झाली नाही. प्रशासन मात्र शेतकºयांमुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या शक्यतेने पोलीस बंदोबस्त लावण्याच्या तयारीत आहे.
भारनियमनाची भर
आॅनलाईन अर्जाची लिंक फेल असणे, थम्ब स्वीकार न होणे, मोबाईल नंबर नसणे, आधार कार्ड नसणे, आदी बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यांना अर्ज भरणे कठीण झाले आहे. आता या अडचणींत भारनियमनाची भर पडली आहे. यातून मार्ग काढत उद्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी एक लाख ७९ हजार २०५ शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे दीव्य पार पाडावे लागणार आहे.

Web Title: Farmer's bread bills at the credit centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.