मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:35 PM2017-12-22T22:35:35+5:302017-12-22T22:36:10+5:30

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभीमानी पक्ष स्थान केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जाती, धर्माला सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढा देऊ, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 Fight for Maratha, Muslim, Dhangar reservation | मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणासाठी लढा

मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणासाठी लढा

Next
ठळक मुद्देनितेश राणे : आम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभीमानी पक्ष स्थान केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जाती, धर्माला सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढा देऊ, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र स्वाभीमानी पक्ष मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाबाबत सकारात्मक असून त्यासाठी लढा देण्याची तयारी असल्याचे सांगून नितेश राणे यांनी सर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन आमचा पक्ष वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षाची आॅनलाईन आणि आॅफलाईन नोंदणी १ जानेवारीपासून सुरू होणार असून पक्ष शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कामगार आदी घटकांसाठी लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युद्धापूर्वी शस्त्र खाली टाकण्याचे काँग्रेसचे धोरण असून सध्या विधीमंडळात काँग्रेस जिवंत आहे की आयसीयूत आहे, हेच कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याचे संपूर्ण कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्या हाती असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी असून विदर्भातील जनतेने स्वतंत्र राज्याची मागणी केल्यास मात्र आम्ही जनतेच्या विरोधात जाणरा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विदभाची मागणी केवळ काही नेते करीत असून त्यांच्या पाठीमागे जनता नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नीरज वाघमारे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शब्द पाळतील
मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना शब्द दिला आहे. तो शब्द मुख्यमंत्री पाळतील, अशी खात्री नितेश राणे यांनी दिली. सध्या शिवसेनेने पाठींबा काढला तरी सरकारला कोणताही धोका नसून २0१९ मध्ये आम्ही ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहू, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title:  Fight for Maratha, Muslim, Dhangar reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.