जिल्ह्यातील पहिली शिक्षण परिषद
By admin | Published: September 21, 2016 02:05 AM2016-09-21T02:05:33+5:302016-09-21T02:05:33+5:30
केंद्रस्तरावर आता केंद्र संमेलनाऐवजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण परिषद घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केली आहेत.
कलगाव येथे आयोजन : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
ंआमीन चौहान हरसूल
केंद्रस्तरावर आता केंद्र संमेलनाऐवजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण परिषद घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केली आहेत. या नवीन बदलानुसार जिल्ह्यातील पहिली शिक्षण परिषद दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे पार पडली.
या परिषदेस शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, गटशिक्षणाधिकारी प्रकाश शिकारे, विस्तार अधिकारी विलास जाधव, मुकेश कोंडावार, राज्य पुरस्कार प्राप्त पंचशिला इंगोले, खुर्शीद पठाण, सरपंच वाहिदाबी, शाळा समिती अध्यक्ष बब्बू भाई उपस्थित होते.
उर्दू शाळेत आयोजित या शिक्षण परिषदेची सुरवात पवित्र कुराणातील ओव्या व हम्द ए नातने झाली. विद्यार्थांनी परिपाठ सादर केला. प्रास्तविक केंद्रप्रमुख विलास चिद्दरवार यांनी केले. शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी उपस्थित पालक व शिक्षकांशी संवाद साधला. उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयाची उकल विविध उदाहरणे व घटनेतील कलमांचा संदर्भ देवून केली. विस्तार अधिकारी विलास जाधव, पंचशिला इंगोले, खुर्शीद पठाण यांचीही यावेळी भाषणे झाली. शिक्षक दिनानिमित्त विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक पंचशिला इंगोले, खुर्शीद पठाण व आमीन चौहान यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. परिषदचे संचालन शिक्षक जुनेद खान यांनी तर आभार मुख्याध्यापक महंमद परसुवाले यांनी मानले. परिषदेला माजी सभापती गफ्फार मलनस, उपसरपंच डॉ. रामेश्वर राऊत, केंद्र प्रमुख किरण बारशे, निर्मल राऊत, तस्लीम सौदागर, हेमंत दळवी, विलास भवरे, कलगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.