आयटीआय विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:13 AM2018-02-06T00:13:26+5:302018-02-06T00:13:42+5:30
ऐनवेळेवर आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याचे आदेश धडकल्याने संतप्त झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकला.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : ऐनवेळेवर आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याचे आदेश धडकल्याने संतप्त झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकला. तसेच जुन्या पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी करीत जिल्हा कचेरीवर धडक दिली.
आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले होते. ही परीक्षा दरवर्षी लेखी स्वरूपात घेतली जाते. परंतु रविवारी सायंकाळी आदेश धडकला. त्यात पहिला पेपर आॅनलाईन पद्धतीने घेण्याचे सांगितले. हा प्रकार विद्यार्थ्यांना माहीत होताच विद्यार्थी संतप्त झाले. आम्ही कोणतीही तयारी केली नाही, परीक्षा कशी द्यायची असा सवाल करीत शेकडो विद्यार्थी थेट जिल्हा कचेरीवर पोहोचले. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन ही परीक्षा आॅफलाईन घेण्याची मागणी केली. यावेळी टर्नर, आरएसी, मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, पेंटर, ट्रॅक्टर मेकॅनिकल, कारपेंटर, ब्युटी पार्लर आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. आता १७ आणि १८ फेब्रुवारीला आॅनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. मात्र ही परीक्षा आॅफ लाईन पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थी करीत आहे.