जवाहरलाल दर्डा स्मृती काटा कुस्त्यांची दंगल २५ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:50 AM2017-11-17T00:50:49+5:302017-11-17T00:51:00+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात ....

Jawaharlal Darda Kota Kusta raid on November 25 | जवाहरलाल दर्डा स्मृती काटा कुस्त्यांची दंगल २५ नोव्हेंबरला

जवाहरलाल दर्डा स्मृती काटा कुस्त्यांची दंगल २५ नोव्हेंबरला

Next
ठळक मुद्देदहा लाखांचे बक्षीस : देशभरातील नामवंत मल्ल येणार यवतमाळात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात २५ नोव्हेंबर रोजी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल दहा लाखांची बक्षिसे दिली जाणार असून देशभरातील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य राहणार आहे. हनुमान आखाड्याचे दिवंगत कुस्तीगीर नथ्थूजी गोकुल वस्ताद पहेलवान, श्रीराम पचगाडे पहेलवान, भैय्यालाल जयस्वाल, वामनराव नाकतोडे ऊर्फ बब्बी पहेलवान, नथ्थूजी नासुरकर पहेलवान, अब्दुल नजीर ऊर्फ बंठोल पहेलवान, शेषराव अजमिरे, मधुकरराव भेडकर पहेलवान, गजानन भाटवडेकर पहेलवान, शेख अब्दुल, शाहू पहेलवान, गोसावी गुरूजी, परशराम तायडे गुरूजी, वसंतराव जोशी गुरूजी, नानासाहेब औदार्य, रमेश तिवारी, विजय मोगरकर आदींच्या स्मृतीनिमित्त अनेक बक्षिसे देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्याला सुभाषदादा बाजोरिया स्मृती प्रशांत बाजोरिया यांच्याकडून ५१ हजारांचे रोख बक्षीस दिले जाईल. व्दितीय क्रमांकाला साई पॉर्इंट आॅटो मोबाईल्सचे दिलीप बोबडे पाटील यांच्याकडून ४१ हजार, तृतीय क्रमांकाला विलास महाजन यांच्याकडून ३१ हजारांचे बक्षीस दिले जाईल. २५ हजारांचे चौथे बक्षीस शैलेश गुल्हाने आणि प्रशांत पोटे यांच्यातर्फे, पाचवे २१ हजारांचे बक्षीस गोदावरी मल्टिस्टेट बँकेतर्फे, सहावे १५ हजारांचे बक्षीस जानमहंमद गिलाणी यांच्या स्मरणार्थ जाफर गिलाणीकडून, सातवे १० हजारांचे बक्षीस दिनेश गिरोलकर यांच्या स्मरणार्थ आर.बी.कन्स्ट्रक्शनतर्फे, आठवे सात हजारांचे बक्षीस विजय डांगे व धनंजय भगतर्फे, नववे पाच हजारांचे बक्षीस मसूद भाई यांच्यातर्फे, दहावे तीन हजारांचे बक्षीस रामचंद्र गजबेतर्फे, अकरावे दोन हजारांचे बक्षीस पुरुषोत्तम जयसिंगपुरे स्मरणार्थ सुरेश जयसिंगपुरेतर्फे, तर बारावे एक हजाराचे बक्षीस महम्मद शमी पहेलवान स्मरणार्थ महंमद शकील पहेलवान यांच्यातर्फे दिले जाईल.
यासोबतच कुस्त्यांचे जोड लावून १००, २००, ३००, ४०० आणि ५०० रूपयांचे बक्षिसही दिले जाणार आहे. या कुस्त्यांच्या विराट दंगलीत मल्लांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कार्याध्यक्ष प्रभाकर गटलेवार, सचिव अनिल पांडे, उपाध्यक्ष रामेश्वर यादव, कुलभूषण तिवारी, कोषाध्यक्ष अनंता जोशी, संघटक प्रताप पारसकर, दीपक ठाकूर, अब्दुल जाकीर, अब्दुल करीम, सुरेश जयसिंगपुरे, उद्धव बाकडे, महंमद शकील, रवींद्र ढोक, कदीरभाई, सुरेश लोहाना आदींनी केले आहे.

Web Title: Jawaharlal Darda Kota Kusta raid on November 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.