बस अडवून चालक वाहकास मारहाण

By admin | Published: November 20, 2015 02:44 AM2015-11-20T02:44:34+5:302015-11-20T02:44:34+5:30

धक्का मारल्याचा आरोप करत चारचाकीतील इसमांनी बस अडवून चालक आणि वाहकास मारहाण केली.

Just hit the driver carrier with the bus | बस अडवून चालक वाहकास मारहाण

बस अडवून चालक वाहकास मारहाण

Next

दिग्रसमधील घटना : नऊ हल्लेखोर पसार
दिग्रस : धक्का मारल्याचा आरोप करत चारचाकीतील इसमांनी बस अडवून चालक आणि वाहकास मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता येथील पॉवर स्टेशनजवळ घडली. मारहाणीत जखमी चालक, वाहकांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दिग्रस आगाराची एम.एच.२०/डी-८६०९ या क्रमांकाची बस येथून मानोरासाठी निघाली होती. दरम्यान, दिग्रसकडे येत असलेल्या महिंद्रा मॅझिक क्र.एम.एच. २९/ए-२७७३ ने या बसचा पाठलाग करून बस अडविली. या वाहनामधील आठ ते नऊ जणांनी चालक सुनील महिंद्रे याला खाली ओढून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या वाहकालाही मारहाण झाली. या प्रकारानंतर सदर वाहन घटनास्थळावरून पसार झाले.
बस थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आली. चालक सुनील महिंद्रे याने तक्रार दिली. यावरून महिंद्रा मॅझिकमधील लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जखमी चालक आणि वाहकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Just hit the driver carrier with the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.