राज्य मार्गावर टाकले नियमबाह्य फायबर केबल
By admin | Published: July 24, 2016 12:48 AM2016-07-24T00:48:44+5:302016-07-24T00:48:44+5:30
पुसद-गुंज या राज्य मार्ग- ५१ वर नियमबाह्य आॅप्टीकल फायबर केबल टाकण्यात आले.
खोदकाम : कंपनी प्रभारींविरूद्ध तक्रार
पुसद : पुसद-गुंज या राज्य मार्ग- ५१ वर नियमबाह्य आॅप्टीकल फायबर केबल टाकण्यात आले. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या प्रभारींवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुसदच्या उपविभागीय अभियंत्यांनी ग्रामीण ठाण्यात दाखल केली. आहे.
पुसद-गुंज या राज्य मार्गावरील कासोळा ते भाटंबामध्ये रिलायन्स जियो कंपनीचे विदर्भ प्रमुख प्रणय पाठक यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅप्टीकल फायबर केबल टाकण्याची परवानगी दिली. त्यानुसार कंपनीने आॅप्टीकल फायबर केबल रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर टाकणे आवश्यक होते. तथापि संबंधितांनी रस्त्याच्या माध्यभागापासून आठ मीटर, ११ मीटर मध्येच खोदकाम करून केबल टाकले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून संबंधितांना याबाबत काम सुरू असताना वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र कंपनीने सूचनांचे कोणत्याही प्रकारचे पालनच केले नाही. कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे रस्ता बाधीत झालाह. याप्रकरणी संबंधित साईट प्रभारी राजू ठवरे, नागपूर तसेच विदर्भ प्रमुख प्रणय पाठक यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा.
त्याचप्रमाणे कंपनीने टाकलेले आॅप्टीकल फायबर केबल काढण्यात यावे, या आशयाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. आता त्या दोघांविरूद्ध पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)