जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:15 PM2018-06-30T22:15:39+5:302018-06-30T22:16:19+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे.

Plantation and Blood Donation Camp for Jawaharlal Darda's Birthday | जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर

जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर

Next
ठळक मुद्दे२ जुलै : जेडीआयईटीमध्ये आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो पथक, लोकमत परिवार, प्रेरणास्थळ आयोजन समिती, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाबूजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी सदर शिबिर आयोजित केले आहे. रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी सहकार्य करणार आहे. या शिबिरात यवतमाळ शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेरणास्थळ आयोजन समिती, लोकमत परिवार, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ पब्लिक स्कूलच्यावतीने करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर शिबिर चालणार आहे. अधिक माहितीसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड (९५११६४८४८८), प्रा. आशिष माहुरे (९१५८९९३३४४) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Plantation and Blood Donation Camp for Jawaharlal Darda's Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.