लग्न समारंभातील उरलेले अन्न रूग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 03:35 PM2019-05-11T15:35:09+5:302019-05-11T15:36:26+5:30

लग्न समारंभात बरेच अन्न उरते. उरलेल्या अन्नाचे दोन घास गरजवंतांपर्यंत पोहचले, तर अन्नाची नासाडी होणार नाही. भुकेल्यांना दोन घास मिळतील. याच उदात्त हेतूने प्रतिसाद फाउंडेशनने शासकीय रूग्णालयात ‘भूकेल्यांना दोन घास’ ही मोहीम सुरू केली आहे.

The rest of the wedding food are in the hospitals | लग्न समारंभातील उरलेले अन्न रूग्णालयात

लग्न समारंभातील उरलेले अन्न रूग्णालयात

Next
ठळक मुद्दे‘भूकेल्यांना दोन घास’प्रतिसाद फाउंडेशनच्या तरुणांचे अविरत सामाजिक योगदान

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लग्न समारंभात बरेच अन्न उरते. उरलेल्या अन्नाचे दोन घास गरजवंतांपर्यंत पोहचले, तर अन्नाची नासाडी होणार नाही. भुकेल्यांना दोन घास मिळतील. याच उदात्त हेतूने प्रतिसाद फाउंडेशनने शासकीय रूग्णालयात ‘भूकेल्यांना दोन घास’ ही मोहीम सुरू केली आहे. लग्नात उरलेले अन्न रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविले जात आहे.
यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात रूग्णांना भोजन मिळते. मात्र त्यांच्या नातेवाईकांना भोजनासाठी बाहेरच व्यवस्था करावी लागते. यातील बहुतांश रूग्णांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. यामुळे रूग्णाचे नातेवाईक अर्धपोटीच राहतात. या नातेवाईकांना भरपेट भोजन मिळावे म्हणून प्रतिसाद फाउंडेशनने एक अफलातून प्रयोग हाती घेतला आहे.
शहरातील मंगलकार्यालयात दररोज कुठला ना कुठला कार्यक्रम अथवा लग्न प्रसंग असतो. कार्यक्रमाअंती बरेच अन्न शिल्लक राहते. या अन्नाची नासाडी होते. अशा ठिकाणी उरलेले अन्न एकत्र करून ते गरजवंतांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रतिसाद फाउंडेशन करीत आहे. रूग्णालयात नातेवाईकांना हे भोजन पुरविण्याचे काम संपूर्ण टिम करीत आहे. या टिमने आतातर वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तींनीही भोजनदान करण्याचे आवाहन केले. दररोज याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अन्नाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागत आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे, अ‍ॅड. हर्षल राठोड, सचिन कावरे, अर्पित शेरेकर, विनोद दोंदल, आकाश बाकडे, शंतनू पाठक यांच्यासह असंख्य सदस्य या उपक्रमासाठी झटत आहे. यामुळे शासकीय रूग्णालयात रूग्णासोबत येणाºया नातेवाईकांची चिंता दूर होत आहे.

दररोज २०० लोकांची व्यवस्था
गरजवंत, गरीब, भिक्षेकरी आणि शासकीय रूग्णालयातील रूग्णांना अन्न वाटप करण्याचे काम ही मंडळी दोन ते तीन महिन्यांपासून करत आहे. या कामात हॉटेल व्यावसायिकांचीही मोठी मदत होत आहे. दरोज किमान २०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था ही मंडळी करीत आहे.

अन्नदानासोबत रक्तदानही
रूग्णालयात केवळ अन्नदान करून ही मंडळी मोकळी होत नाही. रूग्णालयात दररोज कोणाला तरी रक्ताची गरज भासते. अशा स्थितीत पर्यायी रक्त दिले तरच मोफत रक्त मिळते. अन्यथा रक्तासाठी पैसे मोजावे लागतात. प्रतिसादच्या टिमने गरजवंतांना रक्त देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार ही मंडळी आता काम करीत आहे.

Web Title: The rest of the wedding food are in the hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न