शाहू चव्हाण यांना समाज प्रबोधन पुरस्कार
By admin | Published: June 22, 2017 01:05 AM2017-06-22T01:05:37+5:302017-06-22T01:05:37+5:30
आंबेडकरी चळवळीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे शाहू चव्हाण यांना मरणोपरांत गौरव पुरस्कार देण्यात आला.
मरणोपरांत गौरव : बुद्धिस्ट सोसायटी व सामाजिक न्याय विभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आंबेडकरी चळवळीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे शाहू चव्हाण यांना मरणोपरांत गौरव पुरस्कार देण्यात आला. दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने चंद्रपूर येथे झालेल्या सोहळ्यात शाहू चव्हाण यांच्या पत्नी भारती आणि मुलगा अॅड. जयसिंह चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विदर्भ प्रदेशातील आंबेडकरी चळवळीत आपले जीवन समर्पित करणाऱ्यांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. राज्यातील सुप्रसिद्ध मल्ल आणि सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे शाहू चव्हाण यांचाही मरणोपरांत गौरव यामध्ये करण्यात आला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, समाज कल्याण नागपूर प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, चंद्रपूरचे सहायक समाज कल्याण आयुक्त पी.जी. कुळकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.