भीमा नदीच्या तिरी उभा हा विजयस्तंभ ताजा

By admin | Published: January 4, 2016 04:34 AM2016-01-04T04:34:44+5:302016-01-04T04:34:44+5:30

अशा शौर्यगीतांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाला भीमदास नाईक यांच्या स्वरांनी उजाळा दिला. ‘भीम पहाट’ या महार

Taj Mahal is situated on the third floor of the river Bhima | भीमा नदीच्या तिरी उभा हा विजयस्तंभ ताजा

भीमा नदीच्या तिरी उभा हा विजयस्तंभ ताजा

Next

यवतमाळ : भीमा नदीच्या तिरी उभा हा विजयस्तंभ ताजा
मानवंदना कराया जाई बाप भीम हा माझा।।
अशा शौर्यगीतांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाला भीमदास नाईक यांच्या स्वरांनी उजाळा दिला. ‘भीम पहाट’ या महार रेजिमेंटच्या शूरवीरांची शौर्यगाथा सांगणारा कार्यक्रम १ जानेवारीला बोधिसत्त्व बुद्धविहारात पार पडला.
१ जानेवारी १८१८ ला पुण्याजवळील भीमा नदीच्या तीरावर ५०० महार रेजिमेंटच्या सैनिकांनी प्रतिगामी शक्तीचा शिरच्छेद केला होता. तो इतिहास उजागर करण्यासाठी भारिप बहुजन महासंघातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव येथील स्तंभाची प्रतिकृती तयार करून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे यांच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षातर्फे समाजहित जोपासणारे कार्यक्रम घेण्याची हमी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल चुनारकर, खंडेश्वर कांबळे, अ‍ॅड.अरुणा तेलंग, अर्चना कोचे, सुरेखा कांबळे आदींची उपस्थिती होती. भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांसोबतच समाजातील हजारोंचा जनसमूदाय या कार्यक्रमास उपस्थित होता.
कुणाला नशा दारूची, कुणाला नशा कशाची
आम्हाला नशा बुद्धगया व सारनाथची
या गीताने तर गायक भीमदास नाईक यांनी उपस्थित जनसमूदायाला भारावून टाकले व त्याच गीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमासाठी अ‍ॅड.संजीवकुमार इंगळे, गुणवंत मानकर, निरंजन खडसे, केशव भागवत, पद्माकर घायवान, धनंजय गायकवाड, ईश्वर तायडे, विशाल पोले, कुंदन नगराळे, प्रसेनजीत भवरे, अशोक कुटेमाटे, सुधाकर देवरे, वासुदेव भारसाकडे, जगन्नाथ सिरसाट, शंकर तायडे, वासुदेव मानकर, जीवन काळपांडे, शाम नागरिकर, बादल पेटकर, प्रमोद पाटील, किशोर उके, सचिन नगराळे, सागर डोमे, सुरज धोंगडे, कुणाल डोमे, सिद्धार्थ तेलंग, राजू डोये, किशोर नन्नावरे, संदीप वाघमारे, सचिन बागेश्वर, रूपेश राऊत, कपिल रामटेके, राहुल राऊत, नितेश पाटील, सुदर्शन घोडेस्वार, शुभम गणवीर, सागर मेश्राम, गजू थोरात, नीलेश गायकवाड, किशोर कापशीकर, कुणाल खडसे, मनोज रामटेके, किशोर पाटील, बुद्धकिरण कांबळे, सुरेश रामटेके आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Taj Mahal is situated on the third floor of the river Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.