...जिथे केली वाघिणीनं पहिली शिकार तिथेच झाला तिचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 08:32 AM2018-11-03T08:32:07+5:302018-11-03T08:41:38+5:30

13 निष्पाप नागरिकांचा बळी घेणारी टी 1 या वाघिणीला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास गोळी घालून ठार केले, ही घटना बोराटी वन परिसर कंपार्टमेंट 149 मध्ये घडली आहे.

...tiger was death where she was first hunting | ...जिथे केली वाघिणीनं पहिली शिकार तिथेच झाला तिचा अंत

...जिथे केली वाघिणीनं पहिली शिकार तिथेच झाला तिचा अंत

यवतमाळ : 13 निष्पाप नागरिकांचा बळी घेणारी टी 1 या वाघिणीला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास गोळी घालून ठार केले, ही घटना बोराटी वन परिसर कंपार्टमेंट 149 मध्ये घडली आहे. वारंवार चकवा देणाऱ्या टी 1 वाघिणीला ठार करण्यास शेवटी वनविभागाला यश आले. मोठ मोठाले असलेले दाट गवत आणि झाडे यामुळे वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे अवघड होत होते. वारंवार प्रयत्न करून वेग वेगळे प्रयोग करून सुद्धा वनविभाग टी 1 वाघिणीला पकडण्यास अयशस्वी झाले होते. त्यामुळे सर्वच स्तरावरून वनविभागाला रोष सहन करावा लागत होता.  

24 तास 200 कर्मचारी वाघिणीला पकडण्यासाठी दिवसरात्र एक करत होते. परंतु घनदाट जंगलाचा उपयोग करून वाघीण प्रत्येक वेळेस परिसर बदलत होती. दोन दिवसाअगोदर महाराजा बाग नागपूर येथील वाघिणीचे मूत्र जंगल भागात शिंपडले होते, त्या वासाने वाघीण वन पथकाच्या समोर आली होती, याच संधीचा उपयोग करून वनविभागाने बोराटी या भागात अमेरिकन पर्फ्युम आणि दुसऱ्या वाघिणीचे मूत्र शिंपडले, त्याच वासामागे वाघीण बोराटी येथील वाघडोट्टा या पुलाजवळ आली.

प्रथम तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दाट झाडी-झुडुपांमुळे ते अयशस्वी ठरले आणि वाघिणीला त्यानंतर गोळी घालून ठार करण्यात आले, ही माहीत इतकी गुप्त ठेवण्यात आली की अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणाला ही घटनास्थळी जाण्यास मनाई होती. त्या नंतर पंचनामा करून वाघिणीचा मृतदेह नागपूर येथे नेण्याचे सांगण्यात आले. सदर रात्र असल्यामुळे पहाटे 4:30 पर्यंत हा पंचनामा सुरू होता.

Web Title: ...tiger was death where she was first hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ