साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रणांगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 17:46 IST2019-03-21T17:43:20+5:302019-03-21T17:46:36+5:30
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रणांगणात
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी केली. अमरावती येथे वैशाली येडे यांच्या उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला.
वैशाली येडे ह्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून त्या यवतमाळ जिल्याच्या कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपली जीवनयात्रा ७ वर्षांपूर्वी संपवली होती.
दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशालीताई येडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे. यवतमाळ येथील नुकत्याच झालेल्या आणि गाजलेल्या अखिल भारतीय साहित्य सनमेलनाचे उदघाटन वैशाली यांच्या हस्ते झाले होते. यावेळी लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांचं स्वागत आमदार बच्चू कडू, डॉ.प्रा.नयना कडू यांनी केले.
प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, राज्य संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाप्रमुख तथा यवतमाळ नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे,जिल्हाप्रमुख विलास पवार, अमरावती जिल्हाप्रमुख वसू महाराज, जिल्हाप्रमुख बिपीन चौधरी, जिल्हासंपर्क प्रमुख आशिष तुपटकर, विध्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख रवी राऊत, रूपेश सरडे, प्रशांत आवारे आदी उपस्थित होते.