माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसºयाचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसºयातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वत:मध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वत:चा चांगुलपणा आणि दुसºयांचे दुर्गुण नेहमीच दिसतात. दुसºयाचे दुर्गुण पाहण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माणूस आपल्या आणि समाजाच्या विनाशाचे कारण बनतो.
दुर्गुणामुळे मनुष्य आई-वडील, बहीण- भाऊ इतकेच नव्हे तर गुरूपासूनही दुरावतो. स्वत:मध्ये अनेक दोष असतानाही मनुष्य इतरांचे दोष पाहत बसतो. प्रत्येकाच्या मनात, हृदयात आणि अंत:करणात डोकावून पाहिले की, कुणातही काही ना काही ऐब दिसून येतील. कुणाच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष आहेत. मात्र, तीच कृती स्वत:वर केल्यास दुसºयाच्या अंतकरणात दिसणारे दोष स्वत:च्याही अंतकरणात आणि मनात निश्चितच दिसतात. स्वत:मध्येही अनेक उणिवा जाणवतात. त्यामुळे दोष पाहण्याची कृती स्वत: आणि स्वत:च्या मनापासून केल्यास आपणाला कुणातही दोष दिसून येणार नाहीत. इतरांच्या मनाच दर्पणात डोकावून पाहण्यापेक्षा स्वत:च्या मनात डोकावून पाहील्यास आपणाला इतरांमधील दुर्गुण दिसणार नाहीत. मन चक्षू दुसºयांचे नव्हे तर आपलेच दुर्गुण पाहण्यासाठी आहेत. दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलात आणि नको तितका वेळ खर्च केलास तर आपलंच अहीत होते. या उलट स्वत:च्या मन चक्षूने स्वत:चेच अवलोकन केले असते तर आपल्यातील दुर्गुण नक्कीच सुधारता येतात. मात्र, प्रत्येक मुनष्याची ... मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही.
- शुभांगी नेमाने
शिक्षिका, जागृती ज्ञानपीठ, आंबेटाकळी ता. खामगाव.