(Image Credit : Curbed Austin)
मंगळवारी रात्री म्हणजेच १६ जुलैला या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. उद्या दिसणारं चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून पाहता येणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण जवळपास तीन तास सुरू असेल. मंगळवारी रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी संपेल. हे वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल.
चंद्रग्रहण नेमकं कसं होतं?
(Image Credit : Daily Express)
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येत नाही आणि अंधार पडतो याच स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहण हे नेहमीच पौर्णिमेला होत असतं.
आणखी कुठे दिसणार चंद्रग्रहण?
२०१९ या वर्षातील हे दुसरं चंद्रग्रहण असून हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतासोबतच अफगाणिस्तान, यूक्रेन, तुर्की, ईराण, इराक, सौदी अरब, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे.
वेध सुरू होण्याची वेळ
शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाचं वेध नऊ तास आधी सुरू होतात. तर सूर्यग्रहणाचे वेध १२ तास आधी लागतं. या नियमानुसार, चंद्रग्रहण २०१९ मध्ये वेध सुरू होण्याची वेळ १६ जुलैला ८ वाजून ४० मिनिटांनी.