- प्रज्ञा कुलकर्णीमृग : हरिण हे अतिशय गरीब, निष्पाप, भाबड्या स्वाभावाचे असते. परंतु शिकाऱ्याच्या मधुर घंटानादाने वेडे होऊन फसते आणि शिकार होते. मोह होणे, भुरळ पडणे हे सर्वनाशास कारणीभूत होऊ शकते, हा बोध दत्तात्रेयांनी हरिणाकडून प्राप्त केला.
मत्स्य : गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्याच्या मोहाने मासा तो पकडायला जातो आणि गळात अडकतो, आपला जीव गमावतो. आपल्या जीभेवर आपला ताबा पाहिजे हा बोध दत्तात्रेयांनी माशाकडून घेतला.
पिंगला : पिंगला नामक वेश्येस धनसंपत्ती मिळविण्याचा अतिशय लोभ असतो. त्यासाठी ती स्वत:चा देह विकते आणि संपत्ती जमविते. परंतु, एक दिवस तिला उपरती होते आणि तिला वैराग्य येते, सर्व निरर्थक वाटू लागते. ती विरक्त होते आणि देवाला शरण जाऊन भक्ती करु लागते. पिंगला वेश्या असूनही ती सन्मार्गाला लागते, लोभ, मोह सोडून देते, म्हणून दत्तात्रेयांनी तिला आपला सतरावा गुरु केले.
आणखी लेख...
अनुमान प्रमाणानें ईश्वर अस्तित्व..!