१ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरूवात होणार; नियम, विधी आणि महत्व जाणून घ्या एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 04:17 PM2020-08-31T16:17:58+5:302020-08-31T16:25:14+5:30
देवाघरी गेलेल्या कुटुंबातील माणसांना शांती मिळावी, यासाठी उद्यापासून सुरू होत असलेल्या पितृपक्षाचे काही नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पितृपक्षादरम्यान देवाघरी गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या संतुष्टीसाठी, शांती मिळण्यासाठी श्राध्द केले जाते. हा विधी व्यवस्थित केला नाही पित्र असंतुष्ट राहतात असं मानलं जातं. परिणामी व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. देवाघरी गेलेल्या कुटुंबातील माणसांना शांती मिळावी, यासाठी उद्यापासून सुरू होत असलेल्या पितृपक्षाचे काही नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पित्रांना संतुष्ट करण्यसाठी जेवण तसंच पिंडदान केलं जातं. त्यांना शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू पंचांगानुसार पितृ पक्ष अश्विनमास कृष्ण पक्षात असतो. याची सुरूवात पोर्णिमेपासून होते आणि आमावस्येला शेवट होतो. साधारणपणे १६ दिवसांचा पितृपक्ष असतो. १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत हा कालावधी असणार आहे.
दिवंगत व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीलाच श्राद्ध केलं जातं. ज्या व्यक्तीचा दुर्घटनेत किंवा आत्महत्येनं मृत्यू झाला आहे. अशा व्यक्तीचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं. दिवंगत वडीलांचे श्राद्ध अष्टमी आणि दिवंगत आईचे श्राद्ध नवमीच्या दिवशी केलं जातं. जर कुटुंबातील व्यक्तींची मृत्यूची तिथी माहिती नसेल तर श्राद्ध आमावस्येला केलं जातं. सौभाग्यवती महिलेचा मृत्यू झाला असल्यास श्राद्ध नवमीला केलं जातं. सन्यासीचे श्राद्ध द्वादशीच्या दिवशी केलं जातं.
पितृपक्षात पिंडदान केलं जातं. शिजवलेला भात, तिळ, दूध मिसळून पिंड तयार केली जाते. पिंडाला शरीराच्या प्रतिकाप्रमाणे पाहिलं जातं. पितृपक्षात कोणतंही शुभ कार्य, पूजाविधी करू नये. देवी देवतांची रोजची पूजा बंद न करता . फक्त ज्या दिवशी श्राद्ध असेल तेव्हा पूजा करू नये. मोठ्या प्रमाणावर लोक या कालावधीत नवीन दागिने, सामान विकत घेत नाहीत.
श्राद्धाच्या दिवशी पूर्वजांच्या आवडीचे जेवण तयार केले जाते. अनेकजण या जेवणात कांदा लसणाचा वापर करत नाहीत. या दिवसात गाय, कावळा, कुत्रा, मुंग्यांना जेवण दिलं जातं. अनेक विधी करून झाल्यानंतर घरांमध्ये ब्राम्हणांना जेवण दिले जाते. त्यानंतर नकळतपणे झालेल्या चुकांबाबत माफी मागितली जाते. पित्रांना जेवण दिल्यानंतर, कावळ्यांना जेवण दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबातील व्यक्ती जेवण ग्रहण करू शकतात.
हे पण वाचा-
युद्ध जिंकणार! भारतानं आखला कोरोना लसीचा 'ग्लोबल प्लॅन'; पाक वगळता इतर देशांना होणार फायदा
दिवसभरातून तुम्ही कितीवेळा श्वास घेता आणि सोडता? वाचा श्वसनाबाबत माहीत नसलेल्या गोष्टी