शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
5
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
6
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
7
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
8
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
9
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
10
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
11
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
12
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
13
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
14
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
15
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
16
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
17
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
18
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
19
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
20
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

मनाशी मैत्री...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 8:19 PM

एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही सांगितले तरी तो म्हणेल ठीक आहे.

- वैदेही जंजाळे

नको रे मना, क्रोध हा खेदकारी नको रे मना, काम नाना विकारीनको रे मना, सर्वदा अंगिकारनको रे मना, मत्सरु दंभभारू

मन:शांती जीवन जगताना अत्यंत गरजेची असलेली मनाची अवस्था चांगली असावी लागते. खरेतर जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा उत्तर काहीही असले तरी मन थाऱ्यावर येत नाही. या उलट जर मन शांती आणि ध्यान जागेवर असेल त्यावेळी एक पुसटशी खूण मिळाली तरी तुम्हाला तुमचे उत्तर प्राप्त होते. 

जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही स्वत: सोबत, स्वत:च्या विचारांसोबत असता, त्यावेळी तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच मिळते. प्रश्न व अडचण कितीही मोठी असो, काही काळ निवांत स्वत: सोबत वेळ घालविणे गरजेचे आहे.

एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही सांगितले तरी तो म्हणेल ठीक आहे. पण त्याची मनाची अस्वस्था व त्यात येणारे असंख्य विचार त्याला विचलीत करत असतात. हे अशा मनाचे लक्षण आहे ज्यात इतक्या कल्पना भरलेल्या असतात की नवीन ज्ञान किंवा माहिती आत शिरायलाही जागा नसते. मन:शांतीसाठी काही गोष्टी आजच्या धकाधकीच्या, तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक आहेत.

मनाला स्थिर होण्यासाठी तयार करा - आपल्या मनात येणाऱ्या अनियंत्रित विचारांनी अनावर मनामुळे आपली प्राण उर्जा निघून जाते आणि आपण निराश व विफल होतो. मग अशा सैरभैर झालेल्या मनाला स्थिर, शांत करणे गरजेचे असते. आपण प्रत्यक्षपणे मन:शांती मागू किंवा प्राप्त करू शकत नाही. मात्र, मनाला शांत, स्थिर होण्यासाठी तयार नक्की करू शकतो. ध्यान धारणा ही त्यामुळेच अत्यंत गरजेची झालीय.

प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या -जेव्हा अनावर कठीण प्रसंग येतात तेव्हा तुमच्या मनाचे निरीक्षण केलंय का कधी? अशा वेळी मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो आणि मन बेचैन होऊन आपण प्रतिक्रीया व्यक्त करण्यास सुरुवात करतो. अशा बहुतांश वेळी मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो. आपण भावनावश होतो. सतत विचार करतो की असे का घडले? आपल्या सोबतच का घडले? मी काय केले? अशा वेळी मी काय करायला पाहिजे? हा विचार करणे परिस्थितीला दर्जात्मक व आशावादी प्रतिसाद देणे गरजेचे असते.

शांत रहा, निर्णय चुकणार नाहीत - भोवतालच्या परिस्थितीवर आपण मात करू शकत असल्याची आपली क्षमता खूप प्रभावशाली असते. आपले मन आणि देवाने दिलेली बुद्धी ''ब्रेन" हे एक अत्यंत म्हणजे अति संवेदनशील व पावरफूल देणगी आहे. त्यावर जर प्रभुत्व मिळविले तर कठिणातला कठीण प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होते. त्यासाठी ध्यानधारणा, योगसाधना अत्यंत महत्वाचे अंग आहेत.

१. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवतो. ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला स्थिर ठेवू शकतो.२. भावनिक स्थैर्य प्राप्त होते.३. प्रतिक्रिया व्यक्त न करता, प्रतिसाद देण्याची क्षमता प्राप्त होते. ४. आपण स्वत:सोबत भेटण्यास वेळ काढतो.५. स्वत:ची वैचारिक पातळी वाढवतो व निर्णय घेण्यास सक्षम होतो.६. ध्यान लावल्याने तुमचे ध्यान कुठे भटकत नाही.

अत्यंत निराक्ष वाटते तेंव्हा काय करावे?१. स्वत:ची जागा बदला. ( उदा. ज्या जागेवर असाल तेथून उठा व जागा बदला) Change Your Physiology२. आवडीचे संगीत लावा.३. ज्या संगीतात मन रमते अथवा. Mood Changing Music४. अशा वेळेस उपास अथवा Low Sound Track ऐकू नये.५. ज्या गोष्टीमुळे नैराश्य आलय त्या लिहून काढा.६. प्रत्येक गोष्टीसाठी ३ मार्ग शोधून काढा.७. स्वत:ची भाषा बदला Change Your Linguistic

उदा. माझे काम होईल का? माझे काम झालेल आहे, असे बोला व तेच visualize करा. लक्षात ठेवा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही नक्कीच जो हवा तसा बदल घडवून स्वत:चे आयुष्य बदलवू शकता. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक