उद्या महाराष्ट्रभरात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता सगळ्यांनाच असते. यंदा लॉकडाऊनमुळे कोणाच्याही घरी फारसं येणं जाणं नसलं तरी घरच्याघरी मात्र उत्साहानं गणपती बाप्पांचे स्वागत आणि पूजा अर्चा केली जाणार आहे. अशात ऐनवेळी तारांबळ उडायला नको. त्यासाठी पूजेसाठी कोणकोणती साधनसामग्री आवश्यक असते. याबाबत माहिती असायला हवी. आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना आणि पूजाअर्चा करताना कोणतं सामान असणं आवश्यक आहे. याबाबत सांगणार आहोत.
साहित्य:
कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्रे, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर. यापैकी बरंच सामान आपल्या घरी असतंच पण फुलं पान आणि इतर सामान बाजारातून लवकरात लवकर आणून ठेवल्यास ऐनवेळी तुमची गैरसोय होणार नाही.
गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व साहित्याची जमवाजमव सध्या सुरु असेल. यात कापसापासून बनवलेल्या वस्त्रमाळा बनविण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर हे व्हिडीओ नक्की कमी येतील.
हे पण वाचा-
Ganesh Chaturthi 2020 : गणेशोत्सवात 'या' टिप्स वापरून झटपट मिळवा मराठमोळा पारंपारिक लूक
खरं की काय? 'या' साड्या नेसल्यानं रोगप्रतिकारकशक्ती वाढणार; कोरोनापासून होईल बचाव