Ganesh Festival 2019 : बाप्पाला घरी आणताना चेहरा का झाकतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 09:35 AM2019-09-02T09:35:02+5:302019-09-02T09:37:06+5:30
अनेकांना गणपती बाप्पांना घरी कसे आणायचे? त्यांचा चेहरा का झाकायचा? गणपती बाप्पांना देखील दृष्ट लागते का? असे प्रश्न पडतात.
आपण नेहमीच बघत असतो की, गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा घरी आणली जाते, तेव्हा मूर्तीचा चेहरा कापडाने झाकलेला असतो. अनेकांना गणपती बाप्पांना घरी कसे आणायचे? त्यांचा चेहरा का झाकायचा? गणपती बाप्पांना देखील दृष्ट लागते का? असे प्रश्न पडतात. पण यामागचं कारण काय आहे? चला जाणून घेऊ या प्रथांबाबत...
चेहरा झाकावा की नाही?
काही पंचांगकर्ते गणेशाची मूर्ती घरी आणताना तिचा चेहरा झाकावा असं सक्तीचं नाही. काही जण बाप्पाचा चेहरा झाकतात. तर काही जण नाही. मात्र ही प्रथा आपोआप पडलेली आहे. याला कोणतेही धर्मशास्त्रीयदृष्ट्या कारण नाही. काही प्रदेशात बाप्पाचा चेहरा झाकण्याची प्रथा आह तर काही ठिकाणी नाही.
का झाकतात चेहरा?
असा समज आहे की, मूर्ती खूप सुंदर असेल तर लोक वाईट भावनेने तिच्याकडे बघू शकतात. मानवी भावनांचा परिणाम जड वस्तूंवरही होतच असतो. मूर्तीवर असला कोणताही वाईट परिणाम होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो.
मूर्ती घरी आणताना काय करतात?
गणरायाची मूर्ती दुकानातून आणतांना डोक्यावर टोपी घालून जावे. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. डोक्यावर काहीही न घालता पाहुण्याचे स्वागत करणे हा प्रकार आपल्या संस्कृतीला मान्य नाही. डोक्यावर काहीतरी घालून पाहुण्याचे स्वागत करणे हा त्या पाहुण्याचा सन्मान करण्याचा एक भाग आहे.