'काक: कृष्ण: पिक: कृष्ण:'; असा ओळखा संत आणि सामान्यांतील फरक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:09 PM2019-07-09T18:09:32+5:302019-07-09T18:15:19+5:30

आज समाजजीवनात बहिररंग लक्षणालाच प्राधान्य दिले जाते. अंतररंग लक्षण कुणी बघतच नाही म्हणून तर समाज जीवनाला अवकळा आली आहे..!

Identify the difference between the saint and the ordinary human | 'काक: कृष्ण: पिक: कृष्ण:'; असा ओळखा संत आणि सामान्यांतील फरक 

'काक: कृष्ण: पिक: कृष्ण:'; असा ओळखा संत आणि सामान्यांतील फरक 

Next

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

काक: कृष्ण: पिक: कृष्ण:
को भेदो पिक काकयो:
वसंत समये प्राप्ते
काक: काक: पिक: पिक:

कावळा आणि कोकिळा यातील फरक काय..? कावळाही रंगाने काळा आणि कोकिळाही रंगाने काळीच आहे. समजा दोघेही झाडाच्या एकाच फांदीवर बसले असतील तर, ओळखणे कठिणच..

या दोघातला भेद बघावयाचा असेल तर, सुभाषितकार म्हणतात - वसंतऋतूची वाट बघा.वसंत समये प्राप्ते वसंतऋतू आला की, कोकिळा गायला लागते मग कावळ्याला वाटते आपण का गप्प बसा..? मग तोही ओरडायला लागतो मग आपल्याला कळतं की, हा कावळा आणि ती कोकिळा आहे. कोकिळेचा स्वर कळण्यासाठी वसंतऋतूची वाट बघावी लागते तसे संत आणि सामान्य माणूस यांच्यातील भेद कळण्यासाठी दोघांची लक्षणं बघावी लागतील. बगळा आणि हंस दोघेही सारखेच दिसतात पण कोणता हंस आणि कोणता बगळा हे ओळखावयाचे असेल तर, सुभाषितकार म्हणतात - 
क्षीर नीर विभागेतु
हंसो हंस: बको बक:

दूध आणि पाणी यांचं मिश्रण करून ते भांडे दोघांच्या समोर ठेवून द्या. त्या मिश्रणातून पाणी वगळून जो दूधच पितो तो हंस..! 

माऊली म्हणतात -
चांचुचेनी सांडसे खांडिजे पयपाणी राजहंसे
कोणता बगळा आणि कोणता राजहंस हे कळण्यासाठी जशी परीक्षा घ्यावी लागते, तसे सामान्य माणूस आणि संत कळण्यासाठी परीक्षा घ्यावी लागेल. नाहीतर आपण कुणालाही संत म्हणू.. संतांची लक्षणं सांगतांना निळोबाराय म्हणतात -
निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा
संतांचे महत्वाचे लक्षण म्हणजे ते लौकिक विषयांपासून विरक्त असतात. त्यांचा विषय हा नारायणच असतो. तुकोबा म्हणतात -
विषय तो त्यांचा झाला नारायण
नावडे जन धन माता पिता

सामान्य माणूस देहात व तद् विषयक विषयात आसक्त असतो. संताच्या बाबतीत, 
विषयी विसर पडला नि:शेष
अंगी ब्रह्म रस ठसावला

अशी स्थिती असते. आज समाजजीवनात बहिररंग लक्षणालाच प्राधान्य दिले जाते. अंतररंग लक्षण कुणी बघतच नाही म्हणून तर समाज जीवनाला अवकळा आली आहे..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र.- 9421344960)

Web Title: Identify the difference between the saint and the ordinary human

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.