भक्तीची वाट सोडाल तर जीवनाची वाट लागेल : सातारकर महाराज
By Appasaheb.patil | Published: July 11, 2019 05:04 PM2019-07-11T17:04:21+5:302019-07-11T17:07:12+5:30
ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे वाखरी येथे प्रवचन
पंढरपूर : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात टिकेचा सामना सर्वानाच करावा लागतो. अशा टिकेला न घाबरता भक्ती भावाने पांडूरंगाच्या स्मृतीत जो वारकरी टिकूण राहतो तो जीवनात टिकतो. आणि जो टिकतो तोच विजयी होतो. पांडूरंग त्याच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण करतो. वारकरी जेव्हा भक्तीच्या वाटेवर चालतो तेव्हा ती वाट सोडू नका अन्यथा जीवनाची वाट लागेल, असे अनमोल विचार महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार व प्रवचणकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी वारकºयांना केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरूकुल परिसरातील पूर्णब्रह्म योगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड अन्नपूर्णा सदन येथे आयोजित प्रवचनात ते बोलत होते.
ह.भ.प.श्री बाबा महाराज सातारकर म्हणाले, ७५० वषार्पासून निघणाºया वारीला बºयाच वेळा पुरायचा प्रयत्न झाला, परंतू वारी ही सर्वानाचा पुरूण उरली. आज सर्व माध्यमे ही वारीच्या आधारेच आपला टीआरपी वाढवित आहे. वारकरी संप्रदाय किती ज्ञान देतो हे माहिती नाही परंतू ते सर्वानाच प्रेम देते हे नक्कीच आहे. जीवनाच्या गणिताचे उत्तर कधीही कोणाला सापडले नाही तरी संतांनी आम्हाला भक्ती भावात जीवन जगण्याचा उत्तम मार्ग दाखविला आहे. जीवन जगणे हे महत्वाचे नाही तर त्या जीवनात विजयी होणे हे सर्वात महत्वाचे आहे. गीतेची पुढची आवृत्ती ही ज्ञानेश्वरी आहे. त्यामुळे अमृतानुभव पेक्षा याचा आनंद वेगळा आहे. जेथे संत असतात तेथे विवेक सागर असतो. विवेक म्हणजे विचारांची परिपूणार्ता आहे. जेथे गुरू असतो तेथे ज्ञान आहे म्हणून संत हेच आपल्या गुरूस्थानी असावे असेही त्यांनी शेवटी संदेश दिला.