काय आहे वटपौर्णिमेचे महत्त्व? जाणून घ्या पूजा करण्याचा शुभमुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 10:32 AM2018-06-27T10:32:45+5:302018-06-27T10:50:36+5:30

वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रुप मानलं जातं. कारण देवी सावित्रीने तपस्या करुन पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणला होता, असे मानले जाते. 

Importance and significance of Vat Purnima : All you need to know about puja, vidhi and muhurat | काय आहे वटपौर्णिमेचे महत्त्व? जाणून घ्या पूजा करण्याचा शुभमुहूर्त!

काय आहे वटपौर्णिमेचे महत्त्व? जाणून घ्या पूजा करण्याचा शुभमुहूर्त!

हिंदू धर्मात वटपौर्णिमेला फारच महत्व आहे. आज सगळीकडेच वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वट वृक्षाला ब्रम्हा, विष्णु, महेशाचं रुप मानलं जातं. अशी आख्यायिका आहे की, वटवृक्षाची पूजा केल्याने त्यांच्या पतीची रक्षा केली जाते. वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रुप मानलं जातं. कारण देवी सावित्रीने तपस्या करुन पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणला होता, असे मानले जाते. 

कथा -

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात.

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व 

अशी मानले जाते की, वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्‍या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

पूजा साहित्य

2 हिरव्या बांगड्या, शेंदुर, एक गळसरि, अत्तर, कापुर, पंचामृत, पुजेचे वस्त्र , विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबरयाचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहु , सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.

शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी सुरुवात - 27 जून सकाळी 8.12 मिनिटांपासून
पौर्णिमा तिथी कधी संपणार - 28 जून 2018 10.22 वाजता
 

Web Title: Importance and significance of Vat Purnima : All you need to know about puja, vidhi and muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.