बाह्यरुपा पेक्षा आंतररुप श्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:00 PM2019-08-03T16:00:30+5:302019-08-03T16:01:29+5:30

बहूतेक लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा भाग नकळत किंवा त्यांच्या अचेतन अवस्थेमध्ये बनविला आहे

internal personality greater than external | बाह्यरुपा पेक्षा आंतररुप श्रेष्ठ

बाह्यरुपा पेक्षा आंतररुप श्रेष्ठ

Next

बहूतेक लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा भाग नकळत किंवा त्यांच्या अचेतन अवस्थेमध्ये बनविला आहे. कदाचित त्यातील एक छोटासा भाग जागरूकता किंवा चैतन्याने तयार केला असेल. जेव्हा आपण आपले व्यक्तिमत्व तयार करता तेव्हा अशाप्रकारे आपण असा विचार करता की देवाने आपली रचना व्यवस्थित केलेली नाही. आपण आपले व्यक्तिमत्व सुधारू इच्छित असल्यास, याचा अर्थ असा आहे की, आपल्याला असा विश्वास आहे की, विश्वनिर्मात्याने (देव) माझ्यावर पुरेसे काम केलेले नाही.
आपणास असे वाटते की देवाची एवढी मोठी निर्मिती जी पाहिजे तितकी चांगली नाही? हे स्वत:ला सुरक्षित  ठेवण्याच्या सोप्या प्रक्रियेमुळे आहे.ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आधीच अस्तीत्वात आहे. आपण म्हणू शकता की ती इनबिल्ट आहे. ही प्रक्रिया प्रत्येक लहान किटक किंवा प्राण्यांमध्ये अस्तित्वात असते. आपल्यात देखील आहे. आणि यामुळे आपण स्वत:ला  एक लहान व्यक्ती बनविले आहे, जो नेहमीच स्वत:चे रक्षण करत राहतो. ज्यामुळे आपण आज आपल्या व्यक्तीमत्वाचे असे चित्र तयार केले आहे, जे आपण इथून तिथून एकत्र केले आहे.
फक्त एकच गोष्ट आहे ज्यास संरक्षणाची आवश्यकता आहे आणि ती आहे आपले शरीर. आपल्या व्यक्तीमत्वाला संरक्षणाची आवश्यकता नाही. जरी आपण यावर रोज टिका केली तरी ते ठिक असले पाहिजे. होय, हे चांगले आहे की तुम्ही व्यक्तीमत्वविना जगू शकत नाही येथे टिकण्यासाठी, आपले कार्य करण्यासाठी आपल्याला इतर सर्व गोष्टी हाताळण्याची आवश्यकता असेल. परंतु जर त्यात लवचिकता असेल तर आपण परिस्थितीनुसार योग्य प्रकारचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता. यात काहीही चुक नाही. परंतु हे अगदी मोठ्या दगडासारखे आहे. हे नेहमी आपल्यावर वर्चस्व राखत असते. त्याने अशी प्रणाली तयार केली आहेकी जे काही आपल्या व्याप्तीच्या पलीकडे आहे ते आपल्यासाठी एक समस्या बनते.
तुमचे व्यक्तिमत्व तुमचे आहे : हे व्यक्तीमत्व, ज्याला आपण मी म्हणतो, कोणी बनविले? नक्कीच आपण ते बनविले आहे. परंतु आपल्या सभोवतालच्या बºयाच लोकांच्या प्रभावामुळे आपण असे व्यंगचित्र तयार केले आहे. जेव्हा आपण पंधरा किंवा सोळा वर्षाचे असता तेव्हा बरेचदा असे असायचे की एखादा चित्रपट पाहिल्यानंतर आपण त्याच्या नायकासारखा चालत किंवा बसला असता. कदाचित काही वेळा आपण हे हेतुपुरस्सर केले असेल. परंतु बहूधा ते नकळत होते. ज्यामुळे आपण आज आपल्या व्यक्तीमत्वाचे असे चित्र तयार केले आहे, जे आपण इकडून तिकडून एकत्र केले आहे. 
-   सविता लीलाधर तायडे 
 

Web Title: internal personality greater than external

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.