वामनराव देशपांडेआपल्या मनासारखे दान पडले तर ती भगवंतांची कृपा समजावी, त्याहून अधिक काय तर मनासारखे दान पडले नाही तर, भगवंतांनी आपले भविष्यात रक्षण व्हावे म्हणून हा अनुभव दिला आहे. आपण कायम एक लक्षात ठेवावे की आपल्या इच्छा-आकांक्षा जर योग्य असतील तर भगवंतच त्या पूर्ण करतो. भगवंतांनी म्हणूनच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला दिव्य संदेश दिला की,तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहम।।अर्जुनाची इच्छा होती की, भगवंतांच्या अगणित विभूती आपल्या या मर्त्य डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहाव्यात. भगवंतांनी आपल्या या लाडक्या परमभक्ताची इच्छा पूर्ण करण्याचे मनाशी निश्चित केले. कारण एकच. अर्जुन हा भगवंतांचा अनन्य भक्त होता. भगवंतांनी आपल्या या भक्ताला आपल्या अंत:करणातले गुह्य सांगताना म्हटलेच होते की,अन्यन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।‘पार्था, जे माझे अनन्यभावाने, अखंडपणे चिंतन करीत असतात, या दृश्य विश्वातले जे जे ते अनुभवत असतात ते माझेच स्वरूप आहे, असा ज्यांचा भाव असतो, जे दृढ बुद्धीने मलाच मानत श्रद्धा जपत मानतात, माझीच केवळ पूजा करतात, त्यातच मग्न असतात त्या भक्तांची मी पूर्ण जबाबदारी घेतो. त्यांचे मनोवांछित पुरे करतो.’ म्हणून भगवंतांनी आपले विश्वदर्शन भक्तश्रेष्ठ अर्जुनाला दाखवायचे निश्चित केले. परंतु आपला हा लाडका परमभक्त मर्त्य डोळ्यांनी पाहू शकणार नाही हे लक्षात आल्यावर भगवंत अर्जुनाला म्हणाले,न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा।दिव्यं ददामि ते चक्षु: पश्य मे योगमैश्वरम ।।गीता।। पार्था, तुला तुझ्या मर्त्य डोळ्यांनी माझे अथांग विश्वरूप प्रत्यक्ष अनुभवता येणार नाही म्हणून मी तुला दिव्यदृष्टी देतो. त्या दिव्यदृृष्टीने तू माझी परमेश्वरी शक्ती प्रत्यक्ष अनुभव...
आनंद तरंग: भगवंताची कृपा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 2:13 AM