जिंदगी प्यार का गीत है..इसे हर दिल को गाना पडेगा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 10:08 PM2019-09-07T22:08:30+5:302019-09-07T22:09:17+5:30
सुख आलं, तरी समताभाव राखून आनंद घ्या व दुःख आलं तरी समताभाव राखून तटस्थ राहा.
- डॉ. दत्ता कोहिनकर
रात्री दहाचा सुमार, झोपायच्या तयारीत असताना रेडियोवर गाणं लागलं - जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा। जिंदगी गम का सागर भी है, हमके उस पार जाना पडेगा खरोखर जीवन हे सुख-दुःखाचं मिश्रण आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भावांनी संपत्ती वाटून घेतली. मोठा भाऊ उच्चशिक्षित, तर लहान अडाणी. मोठ्या भावानं लहान भावाची फसवणूक करून किमती वस्तू स्वतःकडे ठेवल्या. काही दिवसांनी लहान भावानं मोठ्या भावाला घरातील छताच्या तुळईला वडिलांनी कापडात काहीतरी बांधून ठेवल्याचं दाखवलं. त्यात किमती हिरा व चांदीची काळी पडलेली अंगठी होती. मोठ्या भावानं हिरा स्वतःकडं ठेवला व चांदीची अंगठी भावाला दिली. मोठा भाऊ प्रचंड श्रीमंत - मोटार, बंगला सर्व काही मुबलक, तरीही नेहमी व्याकूळ असायचा. बायकोबरोबर भांडणं करायचा. अधूनमधून दारू पिऊन मुलांना मारझोड करायचा. झोपेच्या गोळ्या घेऊ लागला. कामावर जाणं बंद झालं. त्याची समाजात अवहेलना होऊ लागली. कारण त्याच्या मनासारखं घडलं, की तो प्रचंड खूष व्हायचा व मनाविरुद्ध घडलं, की नाराज व्हायचा. लहान भाऊ मात्र कमी संपत्ती असूनही सुखाने संसार करत होता. कारण चांदीच्या अंगठीवरचं वडिलांनी कोरलेलं वाक्य तो रोज वाचायचा - ह्यये भी बदल जाएगा.ह्ण त्यामुळे तो सुख आलं तरी नाचायचा नाही व दुःख आलं तरी रडायचा नाही. मोठ्या भावाकडं सगळं ऐश्वर्य होतं, पण वडिलांचा ह्यये भी बदल जाएगाह्ण हा मंत्र नव्हता. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात...सुख आये नाचें नही, दुःख आये नही रोय। दोनो में समता रहे - उत्तम मंगल होय। जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे. गीतेतही सांगितलं आहे. ह्यजो आज तुम्हारा है, वह कल किसी और का होगा। तेव्हा सुख आलं, तरी समताभाव राखून आनंद घ्या व दुःख आलं तरी समताभाव राखून तटस्थ राहा. त्याला साक्षीभावाने पाहा. कारण सर्वच अनित्य आहे. सुखी होण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वाध्याय केला पाहिजे. मी कोण? माझी ताकद किती? मी काय करू शकतो? माझे ध्येय काय? प्रत्येकाचा स्वतंत्र पिंड असतो. सगळ्याच पालकांना मुलांनी इंजिनिअर, डॉक्टर व्हावंसं वाटतं. पण आपला व मुलांचा पिंड पाहूनच ध्येय निवडलं पाहिजे व निवडलेल्या ध्येयाला सकारात्मक विचारांची जोड देऊन ध्येयप्राप्ती केली पाहिजे. सकारात्मक विचार मनाची सबलता वाढवतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, ह्यह्यतेहतीस कोटी देवांवर तुमचा विश्वास असेल व स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात.ह्णह्ण तेव्हा मन सबल व निर्मल करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ १५ मिनिटे शांतपणे ध्यानाला बसा व तटस्थपणे जाणाऱ्या-येणाऱ्या श्वासाला जाणत राहा, हाच मनाचा व्यायाम.