डॉ. दत्ता कोहिनकर रविवारची सुट्टी सकाळीच टी.व्ही. वर गाणे चालू होते, अकेले अकेले कहाँ जा रहे हो - अकेले अकेले कहाँ जा रहे हो । मेरे साथ आओ - कहॉ जा रहे हो ॥ गाणे ऐकताच मला निलिमाची आठवण झाली. निलिमा ही उच्चशिक्षित - अत्यंत देखणी - हुशार संगणक अभियंता म्हणून नामांकित कारखान्यात काम करणारी मुलगी. लग्नाचा विषय काढला की, लग्न करायचे नाही म्हणते. या विषयाने चिंतित झालेली निलिमाची आई-निलिमाला माझ्याकडे घेऊन आली होती. निलिमाच्या चेहऱ्यावर नैराश्य पण जाणवत होतं. निलिमाशी वैयक्तिक संवाद साधताना तिच्या लहानपणापासून आई-वडिलांच्या भांडणाचा तीव्र परिणाम तिच्या अंर्तमनावर झालेला जाणवला. ती म्हणाली. वडील आईला खूप मारझोड करायचे, शिवीगाळ करायचे, गुलामासारखं जीवन ती जगली. स्वत:च्या आयुष्यात तिला कुठलीही गोष्ट मनासारखी करता आली नाही. कामवाली - उपभोगाची दासी असा दुय्यम दर्जा तिने आयुष्यभर सोसला. माहेरच्यांनी पण तिला घरात स्थान दिले नाही. गुराढोरासारखं जीवन ती जगली. सर लग्न म्हटलं कि मला भितीच वाटते. मी अध्यात्मात आयुष्य काढायचं ठरवलंय सर. सर्व ऐकून घेतल्यावर मी तिला म्हणालो, हे बघ निलिमा तु आईच्या काळी स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या नव्हत्या. तू आज 50,000/-रू. प्रतिमहा कमावतेस. त्यावेळी स्त्री ही चुल व मुल यापुरतीच होती. तिला दुय्यम दर्जा असायचा. आज स्त्री-पुरूष समानतेचे युग आहे. त्याकाळी स्त्रीयांच्या संरक्षणासाठी कायदे फारसे कडक नव्हते. आज स्त्रीयांसाठी त्यांचा छळ होऊ नये म्हणून कायदेशीर विशेष विभाग शासनाने निर्माण केले आहेत. पूर्वी स्त्री ज्या घरी दिली तेथे तिला कितीही त्रास झाला तरी ते घर तिला सोडता येत नसे. माहेरची लोक इज्जतीसाठी तिला स्वीकारायला नाकारत असत. आज माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीला आपल्या घराचे दरवाजे केव्हाही खुले ठेवले आहेत. अमेरिकेत नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार ६० % मनोरूग्ण हे त्यांचे कामजीवन उध्वस्त झाल्यामुळे झालेले आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात ... आशा ही समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे ॥ त्यामुळे मनातील विकाराचं दमन करून मनोरूग्ण होण्यापेक्षा निसर्गाच्या नियमांचे पालन करणे हिताचे असते. निलिमा जीवन ही एक अनुभवमालिका असते. प्रत्येकाचे अनुभव-कर्मफळ वेगळे असते. ते स्वत: स्वत:नेच घ्यावयाचे असतात. शेत म्हटले कि पिकाबरोबर तण येणारच, घर म्हटले कि तूतू-मैंमैं होणारच, गुलाबाला पण काटे असतातच. अनुकूल व प्रतिकूल, सुख आणि दु:ख, ऊन आणि सावली अशा परस्परविरोधी अनुभवांचा आकृतीबंध म्हणजे जीवन. बहिणाबाईंची कविता तू ऐकलीच असेल, अरे संसार-संसार । त्याला कधी रडू नये। गळयातल्या हाराला । लोढणे कधी म्हणू नये ॥ या सगळया चचेर्नंतर निलिमाला मी म्हणालो -एक डाव खेळून तर बघ निलिमाने आत्मचिंतन केले व ती लग्नाला तयार झाली. महिन्यातच तिच्याच कारखान्यातील तिला आवडणाºया अभियंत्याशी तिचे लग्न ठरले. लग्नपत्रिकेत प्रेषक म्हणून माझे नाव झळकत आहे.
(लेखक व्याख्याते आहे.