तणावाचे प्रबंधन: काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 04:59 PM2019-07-26T16:59:39+5:302019-07-26T16:59:57+5:30
जो तणावापासून वाचण्याचा जितका चांगल्या प्रकारे प्रबंध करतो, तोच आपले जीवन सुध्दा चांगल्या प्रकारे जगु शकतो.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लहान मुले, युवा, वृध्द, गरीब, श्रीमंत, सर्वांनाच काहींना काही कारणाने तणाव येत असतो. परिणामत: त्यांच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात दु:ख, अशांती पहायला मिळते. म्हणूनच तणावाचे प्रबंधन करणे ही काळाची गरज आहे. जो तणावापासून वाचण्याचा जितका चांगल्या प्रकारे प्रबंध करतो, तोच आपले जीवन सुध्दा चांगल्या प्रकारे जगु शकतो.
असे म्हटले जात ेकी, मन खुश तो जहान खुश’ जीवनात जसे, योग्य आहार, विहार व निद्रा यांना महत्व आहे. तसेच मनाच्या खुशीचे देखील महत्व आहे. त्यामुळे मनाला खुशी प्राप्त व्हावी यासाठी चांगल्या प्रतीचे संगीता ऐका, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा, मनाला पसंत असलेल्या चांगल्या गोष्टी करा, एखादा छंद जोपासा, आपल्या आवडीची समाज सेवा करा, ईश्वरीय ज्ञानाचे मनन चिंतन करा, दुसºयांना आनंद द्या, सर्वांशी प्रेमपुर्वक व्यवहार करा, सदैव स्वमानात रहा, दुसºयाचे केवळ गुण पहा, सर्वांविषयी मनात शुभभावना व शुभकामना ठेवा, मनाच्या विरूध्द किंवा मनाला भारी करणारे, दु:ख देणारे कोणतेही कार्य करू नका. खरे तर आपण जेवढे मनाला ईश्वरीय चिंतनामध्ये लावतो, मन्मनाभव स्थितीमध्ये राहतो, सकारात्मक चिंतन करतो, तेवढे आपोआपच मनोरंजन होते व मनाला अपार खुशीची प्राप्ती होते. आध्यात्मिक चिंतनामुळे मनाला विपरीत परिस्थितीशी लढण्याची शक्ती प्राप्त होते. मन सशक्त होते, फलस्वरूप आपण तणावापासून खुप दूर राहतो.
वर्तमान समयी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपला दृष्टीकोन व दृष्टी सकारात्मक बनवा. आपले मन खात राहील, असे कुठलेही कर्म करू नका. विपरीत परिस्थितीला सुध्दा ईश्वरीय ज्ञान व राजयोगाच्या आधारे धैर्यता पुर्वक तोंड द्या, कुठल्याही परिस्थितीला घाबरून जावू नका कारण स्वयं ईश्वर आपल्या सोबत आहे. तसेच संगम युगाचा समय देखील कल्याणकारी आहे. त्यामुळे आपले कधीही अकल्याण होणार नाही, हा दृढविश्वास मनात बाळगा, म्हणजे तुमचे जीवन सदैव हेल्दी (स्वस्थ्य), वेल्दी (धनसंपन्न) व हॅपी (आनंदी) अनुभवता येईल.
सारांशाने असे म्हणता येईल-
सदा सकारात्मक जीवनाची कास धरा।
तेणे जणवमुक्तीचा अनुभव तुम्ही करा।।
- ब्र.कु.सुषमा दिदी,
रायगड कॉलनी, खामगाव.