जरा विसावू या वळणावर, या वळणावर...सर्व ब्रह्मवत्सांना संगमयुगावर मिळालेला हा नवीन जन्म, ह्या जन्मामध्ये चांगले-वाईट जे काही आपण आपल्या मनाच्या तिजोरीत बंद करून ठेवले आहे त्याला ईश्वरचरणी स्वाहा करण्याची ही उत्तम वेळ आहे. ह्या चंचल मनामध्ये जे काही साठवून ठेवले आहे, जोपर्यंत त्या सर्व गोष्टी, प्रसंग आपण ऊी’ी३ी (काढून टाकत) करीत नाही तोपर्यंत शिवबाबाकडून जे रोज मुरलीद्वारे नवीन, निराळे ज्ञान मिळत आहे त्याचा संग्रह होऊ शकत नाही. जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगाचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगातून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनामध्ये लाभ होऊ शकतो. मनोवैज्ञानिकांच्या दृष्टीने आपल्या मनामध्ये दिवसभरात ३०,००० किंवा त्याहूनही अधिक विचार येतात. थोडं थांबून जर त्याचे अवलोकन केले की माझे हे मन नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये ु४२८ (व्यस्त) आहे तर आढळून येईल की निरर्थक, नकारात्मक, प्रश्नार्थक विचारांच्या गोंधळामध्ये ते फसले आहे. मनाची ही ओढाताण, अस्वस्थता जर थांबवायची असेल तर मनाला सद्विचारांनी भरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायला हवा. जसे एखाद्या फुलदाणीसाठी अतिशय सुंदर, रंगीबेरंगी, सुगंधी फुलांची निवड केली जाते तसेच आपण ह्या मनामध्येसुद्धा सुखद, सुंदर, समाधानी विचारांची निवड केली तर मन अतिशय शक्तिशाली झाल्याचे आपल्यास जाणवेल. विचारांची शुद्धता आणि स्पष्टता आपल्याला श्रेष्ठ बनविते.भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर,जरा विसावू या वळणावर, या वळणावर...
सर्व ब्रह्मवत्सांना संगमयुगावर मिळालेला हा नवीन जन्म, ह्या जन्मामध्ये चांगले-वाईट जे काही आपण आपल्या मनाच्या तिजोरीत बंद करून ठेवले आहे त्याला ईश्वरचरणी स्वाहा करण्याची ही उत्तम वेळ आहे. ह्या चंचल मनामध्ये जे काही साठवून ठेवले आहे, जोपर्यंत त्या सर्व गोष्टी, प्रसंग आपण ऊी’ी३ी (काढून टाकत) करीत नाही तोपर्यंत शिवबाबाकडून जे रोज मुरलीद्वारे नवीन, निराळे ज्ञान मिळत आहे त्याचा संग्रह होऊ शकत नाही. जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगाचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगातून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनामध्ये लाभ होऊ शकतो. मनोवैज्ञानिकांच्या दृष्टीने आपल्या मनामध्ये दिवसभरात ३०,००० किंवा त्याहूनही अधिक विचार येतात. थोडं थांबून जर त्याचे अवलोकन केले की माझे हे मन नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये ु४२८ (व्यस्त) आहे तर आढळून येईल की निरर्थक, नकारात्मक, प्रश्नार्थक विचारांच्या गोंधळामध्ये ते फसले आहे. मनाची ही ओढाताण, अस्वस्थता जर थांबवायची असेल तर मनाला सद्विचारांनी भरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायला हवा. जसे एखाद्या फुलदाणीसाठी अतिशय सुंदर, रंगीबेरंगी, सुगंधी फुलांची निवड केली जाते तसेच आपण ह्या मनामध्येसुद्धा सुखद, सुंदर, समाधानी विचारांची निवड केली तर मन अतिशय शक्तिशाली झाल्याचे आपल्यास जाणवेल. विचारांची शुद्धता आणि स्पष्टता आपल्याला श्रेष्ठ बनविते.