-डॉ. मेहरा श्रीखंडेआपले स्वत:चे जीवन घ्या. हे जीवन किंवा शरीर असंख्य अशा छोट्या छोट्या भागांनी भरलेले आहे. ते वैयक्तिकरीत्या वेगवेगळे जीवन आहे. ही सर्व शरीरे किंवा जीवने प्रचंड एकसंघरीतीने काम करतात. ती अनंत काळापर्यंत काम करीत राहतात. ज्या वेळी आपण मरतो, त्या वेळी मधमाशांच्या झुंडीप्रमाणे हे भाग स्वत:ला दुसरीकडे घेऊन जातात व दुसऱ्या शरीराने नवीन वातावरणात काम करू लागतात. - थॉमस एडिसनहे जग असंख्य गूढ गोष्टींनी भरलेले आहे व ही गूढता कार्यकारण भावाच्या पलीकडील आहे. मृत्यू ही एक सत्य व टाळता न येण्याजोगी गोष्ट आहे किंवा ती आपल्यातलाच एक भाग आहे. त्याला आपण आत्मा, प्राणमय कोष म्हणतो. तो दुसऱ्या एखाद्या सत्यतेत जातो जी आपल्या सत्यतेत गुंतून पडलेली असते. जर आत्मा खरोखरच वाचत असेल तर तो जिवंत लोकांशी बोलू शकत असेल का ? अध्यात्माचा केंद्रीय दृष्टिकोन हा दोन भागांचा आहे. पहिल्यांदा, तो असे गृहीत धरतो की मानव हा भौतिक मरणातून वाचू शकतो व नंतर दुसºया प्रतलात जाऊन कार्यरत होतो. दुसरे म्हणजे काही माणसे ज्यांना देणगी प्राप्त झालेली असते ती मेलेल्या माणसांशी बोलू शकतात. या लोकांना माध्यमे असे म्हणतात, ज्यांच्याद्वारे आत्मे आपले अस्तित्व माणसांपुढे दृगोच्चर करू शकतात. माध्यमे ज्यांना निरनिराळ्या अतींद्रिय शक्ती असतात, ती आत्म्यांच्या जगात जाऊन त्यांच्याशी बोलू शकतात. खालचे जग भौतिक जगाशी मिळतेजुळते आहे. वेळ व काळ यांचा या ठिकाणी काहीही उपयोग नसतो. आत्मा हा विरळ भागाचा बनलेला आहे. ज्याचा अर्थ असा आहे की, भौतिक जगातील पदार्थांपेक्षा अतिजलद कंपनांनी तयार होणाºया पदार्थाचा तो बनलेला आहे.
गूढता कार्यकारण भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:54 AM