नवी दिल्लीः 149 वर्षांनंतर दिसणाऱ्या दुर्मीळ चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे. 149 वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला ग्रहण लागलं होतं, त्यावेळी चंद्र हा शनि आणि केतूबरोबर धनू राशीमध्ये स्थित होता. तर सूर्य राहूसोबत मिथुन राशीमध्ये होता. मंगळवारी मध्यरात्री 1.31 वाजता चंद्रग्रहणाला सुरुवात झाली असून, पहाटे 4.29 वाजेपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध आली असून, जवळपास तीन तास हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे.कोलकातातल्या एमपी बिर्ला तारामंडळ संशोधन आणि अकादमीचे संचालक देबीप्रसाद यांच्या मते, मध्यरात्री तीन वाजता चंद्रग्रहण स्पष्टपणे नजरेस पडणार आहे. जेव्हा चंद्राचा जास्त करून भाग कललेला असेल. खगोलीय हालचालींची आवड असणाऱ्यांनी ही संधी दवडता कामा नये, कारण 2021पर्यंत अशा प्रकारचं कुठलंही चंद्रग्रहण पाहता येणार नाही. भारतातल्या प्रत्येक भागातून हे चंद्रग्रहण थेट पाहता येणार आहे. चंद्राला पहाटे 4.29 वाजेपर्यंत हे ग्रहण लागलेलं दिसेल. पहाटे 3.01 वाजता चंद्राच्या 65 टक्के व्यास पृथ्वीच्या सावलीखाली असेल. भारतात पुढचं चंद्रग्रहण 26 मे 2021ला दिसेल, जेव्हा चंद्राला पूर्ण ग्रहण लागेल.
- ग्रहणात हे करा अन् हे करू नका
ग्रहणात मंत्राचा जाप सुरूच ठेवला पाहिजेग्रहणात अन्न शिजवू नये किंवा काही खाऊ नयेखाण्या-पिण्याच्या वस्तूमध्ये तुळशीची पानं टाकून ठेवली पाहिजेतग्रहणात घरातल्या देवघराचे दरवाजे आणि पडदे बंद करणं गरजेचं आहे. ग्रहणात कोणतंही शुभ आणि नवं कार्य सुरू करू नयेग्रहणात जीवाणूंचा प्रादुर्भाव तेजीनं वाढणार असून, तो पसरणार आहे. ग्रहणानंतर पूर्ण घरात गंगेच्या पाण्याचा शिडकावा करावा