बा. भो. शास्त्रीया सूत्रात अज्ञान दशेतले क्षण सोडून द्यायाचे अन् सुजाण अवस्थेतला बोधाचा क्षण आहे, तिथून पहिला क्षण मोजायचा आहे. ‘सब्बं क्षणिकं’ असं बुद्धाला कळलं ते महानिर्वाणाच्या उत्तर क्षणापर्यंत तसंच टिकलंं, हेच ते दान क्षणांंचं मधुमीलन आहे. असंं ज्ञान आपल्याला पण कधी कधी होत असतं. मुलगा झाला की आनंदाचा, शिक्षा भोगताना पश्चात्तापाचा, स्मशानात वैराग्याचा, विरहात मीलनाचा कधी सावधानतेचा क्षण सर्वांनाच भेटतो, पण ते मोहाने धूसर होत जातो व व्रत पातळ होत जातंं. मनाला बसणाऱ्या हेलकाव्याने निश्चलता जाते व चंचलता हाती येते.संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘निश्चलत्वाची भावना जरीनव्हेचि देखै मनातरी शांती केवी अर्जुनाआपु होए’माणसं समूहाने राहतात, पण संयोगात निर्माण झालेली आपुलकी वियोगापर्यंत टिकताना दिसत नाही. मला चांगली संधी चालून आली होती. तो क्षण चुकला नसता, तर माझं बरं झालं असतंं. असंं आपण म्हणतो, तेव्हा क्षणाचंं मोल आपल्याला कळलेलं असतं. वाईट क्षणाचंं दु:खणंंही कुठल्या तरी क्षणापासून सुरू झालेलं असतं ते आपण अनुभवत असतो. आरंंभाचंं सुख मध्येच खंंडित होतं किंवा शेवटी तरी दु:खात रूपांतर होतं. मैत्री टिकत नाही. आरंंभ सुखाचा, पण अंत दु:खाने होतो. घरी आलेला पाहुणा जाईपर्यंत तरी गोडवा टिकला पाहिजे. सत्कारप्रसंंंगी केलेली स्तुती भाषण संंपेपर्यंत टिकते की नाही, याची भीती वाटते. समोर दिसला की स्तुती, पाठ फिरविली की निंंदा असंं घडतंं. कुटुंब विभक्त होताना कटुता निर्माण होते. सुरुवातीची ओढ तेढाचंं रूप घेते. क्षण कटू, तिखट, बोचरे, हसरे, दुखद व सुखदही असतात, दुखरे असतात.
आनंद तरंग - पूर्वोत्तर क्षण दुर्लभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 3:43 AM