सुखी माणसाचा सदरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:49 AM2019-05-27T05:49:39+5:302019-05-27T05:49:48+5:30

आमच्या साधक लहानपणी मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक सुंदर बोधकथा होती.

The Sadra of the Happy Man | सुखी माणसाचा सदरा

सुखी माणसाचा सदरा

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले
आमच्या साधक लहानपणी मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक सुंदर बोधकथा होती. एक राजा दु:ख, वेदना, राज्यात चालणारे षड्यंत्र यांना कंटाळून गेला होता. राजवाड्यातून बाहेर काही अंतरावर खळखळत्या नदीचे पाणी पिऊन व सळसळत्या वृक्षाची पाने खाऊन हिरवळीच्या हिरव्यागार गालिच्यावर डेरेदार हिरव्याकंच्च वृक्षाखाली एक कलंदर कलाकार बासरी वाजवीत बसला होता. जीवनातल्या सुखाचे सारे सूर त्याच्या बासरीतून झरझरत होते. तेव्हा राजाला वाटले, हा माणूस सुखी आहे. याच्याकडून आपण सुखाचा सदरा मागून घेऊ. जवळ जाऊन पाहतो तो काय, अरे! या माणसाच्या अंगावर सदऱ्याचा पत्ताच नाही. डोक्यावर शिरस्त्राण अन् पायात पादत्राणही नाही. फक्तएक लंगोटी आणि लाकडाची एक बासरी एवढीच काय ती त्याची संपत्ती अन् तरीही तो राजाला संत तुकडोजी महाराजांच्या शब्दात उत्तर देत होता.
पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे।
शांती सदा वीराजे या झोपडीत माझ्या।।
हे राजा! तुझ्या पायासी गजांतलक्ष्मी लोळण घेते. तुझ्याकडे सतरा-सतरा महाल आहेत. सुख उपभोगाच्या पाठीमागे लागून तू सदऱ्यांची संख्या एवढी वाढवलीस की, सदºयाचा रुबाब सांभाळण्यातच तुझे सारे दिवस खर्ची पडले. आयुष्य खर्ची पडले; पण मला एकही ‘सदरा’ नाही. तो सांभाळण्याची उठाठेव ही नाही अन् फाटला तर दु:खही नाही. कारण सुखी माणसाला सदराच नसतो. आपल्यासारखे दु:खी राजे मात्र कनक, कांता, कामिनी, कीर्तीचे ‘सदरे’ गोळा करण्यात एवढे व्यस्त आहेत की, आत्मसुखाच्या चिंध्या -चिंध्या होत आहेत. जीवघेण्या स्पर्धेत तोंडाला फेस येत आहे आणिआत्मसुखाचा सुखद वारा वाहत राहतो तो आमच्या बाजूने फिरकतसुद्धा नाही.

Web Title: The Sadra of the Happy Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.