संताची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:09 AM2018-06-05T03:09:31+5:302018-06-05T03:09:31+5:30
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे.
- डॉ.भूषण कुमार उपाध्याय
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. सन् या शब्दाचा अर्थ आहे ‘होत असलेला’. होत असल्या बाबतची जी क्रि या आहे ती केवळ वर्तमानकाळातच होऊ शकते. शेवटी संत तो आहे जो वर्तमान काळातच राहतो. तो भूत किंवा भविष्यकाळ या दोन्हींपासून लांब राहात असतो. साºया चिंता आणि तणाव यांचे कारण हे एकतर भूतकाळापासून किंवा भविष्यकाळापासून निर्माण होते. शेवटी आपली चेतना आपल्या परम अवस्थेमध्ये अशावेळी पोहोचू शकते, जेव्हा ती वर्तमानकाळामध्ये असते.
हेच कारण आहे की अध्यात्माची सगळी साधने आपल्याला वर्तमानकाळातच प्रस्थापित करतात. योग, ज्ञान आणि भक्ती यांच्या क्षेत्रात ज्या ज्या विधी विकसित झाल्या आहेत, त्या सर्व आपल्याला वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकवतात. आपण जसेही वर्तमानकाळात स्थापित होतो, तत्क्षणी आपले मन आनंदाने भरले जाते.
शेवटी संताचे पहिले लक्षण आहे की जे नेहमी वर्तमानात राहतात. हेच कारण आहे की संताचे विचार पूर्णपणे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय असतात. संताची वाणी आणि कृती पूर्णपणे पारमार्थिक आणि सर्वकालीन असते. ती कोणत्याही वर्ग अथवा काळाकरिता असत नाहीत.
वर्तमानकाळामध्ये प्रस्थापित होण्यासाठी सर्वात सुगम आणि प्रभावी साधना ही श्वासाची असते. हा श्वास जन्मापासून मृत्यूपर्यंत चालत असतो. श्वासाचे चालू असणे हे सदैव वर्तमान काळातच होऊ शकते. शेवटी या श्वासास आपल्या चेतनेला जोडून आपण आपल्याला वर्तमानामध्ये स्थापित करू शकतो. शांत बसून निरपेक्ष भावाने श्वासाचे निरीक्षण केल्यावर मन हळूहळू भूत आणि भविष्यापासून दूर जाऊ लागते. मनामध्ये जे विचारकल्लोळ सतत उठत असतात, ते हळूहळू शांत होत जातात आणि आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते. जसजशी आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते, तसतसा संतपणाचा भाव आपल्या जीवनात येऊ लागतो आणि काही विशिष्ट लक्षणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसू लागतात. सत्याकडे त्याची ओढ निर्माण होऊ लागते. तो अहिंसक आणि दुसºयांच्या धनलोभापासून मुक्त होत जातो. संग्रह करण्याची प्रवृत्ती समाप्त होते आणि तो आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकतो. मनाच्या शुद्धीबरोबरच त्याच्यात आनंद निर्माण होत जातो.