चिंता चिंता समाप्रोक्त: बिंदू मात्रं विशेषत: सचिव दहते चिंता, निर्जिंव दहते चिता
चिता आणि चिंता यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे. खरे पाहू जाता, अनुस्वार हा धोकादायक आहे. अनुस्वार जर काढून टाकला तर, माणसाला चितेवर जावे लागते ह्या विधानाचा अर्थ बघितला तर, असे लक्षात येते की, चिंता रोग ज्याला झाला त्याची व्याधी निघणे कठीण आहे. ह्या व्याधीमधून बाहेर पडायचे असेल तर, आत्मविश्वासाचे बळ आवश्यक आहे. ह्या भूतलावर अवतिर्ण झालेल्य संसारातील प्रत्येकाला काहीना काही चिंता असतेच. व्यक्ती परत्वे चिंतेचे प्रकार विविध असू शकतील. त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक होत असतो. चिंतेतून मुक्त व्हायचे असेल तर नैराश्य दूर करावे. मनामनात सुसंवाद साधून चैतन्य वाढवावे हा संताचा विचार आशावादी वाटतो. चिंता करणे ही माणसाची एक व्याधी आहे. भूंगा जसा लाकडाला पोखरतो त्याप्रमाणे चिंतारूपी भूंगा मानवी जीवन पोखरीत असतो. बुडत्याचा पाय जसा खोलात जात असतो त्याप्रमाणे चिंता करण्याची स्थिती होत असते. चिंता केल्याने जीवनातील समस्या अधिकाधिक वाढतात. म्हणूनच संत सांगतात त्याप्रमाणे ‘शुभचिंतन’ करीत राहण्याची प्रकृती हा चिंतनावर एकमेव उपाय आहे.
-हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगेशेगाव.