पुणे : अकरावीच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया शुक्रवार (दि. २७) पासून सुरू होणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना दि. २७ व २८ जुलै यादिवशी आॅनलाईन अर्जाचे भाग १ व २ भरता येणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºया पूर्ण झाल्या आहेत. दुसºया फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीदि. २१ जुलैपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत होती.प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सुमारे ७६ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी दोन फेºयांमध्ये प्रवेश घेतले आहेत. तिसºया फेरीची प्रक्रिया दि. २३ जुलैपासून सुरू होणार होती. त्यानुसार दि. २६ जुलैला गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे नियोजन होते.मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्याक महाविद्यालयांबाबत दिलेल्या निर्णयामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे प्रवेश समितीने गुरुवारी तिसºया व चौथ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले.सुधारित वेळापत्रकदि. २७ जुलै - रिक्त जागा व तिसºया यादीतील कटआॅफ जाहीर करणे.दि. २७ व २८ जुलै - आॅनलाईन अर्जाचा भाग १ व २ भरणे.दि. ३१ जुलै - तिसरी नियमित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.दि. ३१ ते २ जुलै - तिसºया गुणवत्ता यादीमधील प्रवेश.दि. ३ आॅगस्ट - रिक्त जागा व तिसºया गुणवत्ता यादीतील कटआॅफ प्रसिद्ध करणे.दि. ३ ते ४ आॅगस्ट - चौथ्या फेरीसाठी आॅनलाईन अर्जाचा भाग १ व २ भरणे.दि. ७ आॅगस्ट - चौथी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे.दि. ७ ते ९ आॅगस्ट - चौथी नियमित गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश.दि. १० ते ११ आॅगस्ट - महाविद्यालय स्तरावरील बायफोकल अभ्यासक्रमाचे प्रवेश अपलोड करणे.
जुने अर्ज कायम राहणारमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इनहाऊस कोट्यातील २० टक्के जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेने भरण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अकरावीची केंद्रीय प्रक्रियेतील एकूण प्रवेश क्षमता वाढणार आहे. त्यामुळे सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना भाग १ किंवा २ मध्ये पुन्हा बदल करण्याची संधी दिली आहे. जुन्या वेळापत्रकानुसार भाग १ व २ भरलेल्या विद्यार्थ्यांना हे अर्ज कायम ठेवता येणार आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत वाढीव जागांनुसार बदल करण्याची मुभाही असेल, अशी माहिती राऊत यांनी दिली.