Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 10 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 08:04 AM2019-03-10T08:04:48+5:302019-03-10T08:20:11+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
मेष राशीत जन्मलेली आजची मुलं मंगळ नेपच्यून शुभयोगाच्या सहकार्याने कार्यप्रांतात प्रवास सुरू ठेवतील. बौद्धिक प्रांत, व्यावहारिक विभाग यात आजच्या मुलांचे कर्तृत्व चमकणार आहे. शोधकार्याशी संबंध येईल.
मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
रविवार, दि. 10 मार्च 2019
- भारतीय सौर 19 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शद्ध चतुर्थी 28 क. 07 मि.
- आश्विनी नक्षत्र 26 क. 57 मि., मेष चंद्र
- सूर्योदय 06 क. 53 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि.
- विनायकी चतुर्थी
दिनविशेष
1897 - आद्यमुख्याध्यापिका, शिक्षिका, समाजसुधारक म. फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे निधन.
1918 - आवाजाची देणगी लाभलेले गायक, अभिनेते सौदागर नागनाथ गोरे तथा छोटा गंधर्व यांचा जन्म.
1929 - कवी, दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर यांचा जन्म.
1959 - शिक्षणतज्ञ, समाजसेवक, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंदराव आनंदराव जयकर यांचे निधन.
1971 - कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन.
1999 - प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचे नाशिक येथे निधन.