Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 16 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 08:17 AM2019-03-16T08:17:36+5:302019-03-16T08:17:58+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
20 क. 39 मि. पर्यंत मिथुन राशीत जन्मलेली मुलं राहतील. त्यानंतर मुलं कर्क चंद्र राशीची असतील. विचारांचा वेग आणि प्रयत्नांची शक्ती यामधून मुलं प्रगतीचा प्रवास सुरू ठेवतील. त्यात अधिकाधिक सफलता समावेश करील.
मिथुन राशी- क, छ, घ
कर्क राशी- ड, ह आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शनिवार, दि. 16 मार्च 2019
- भारतीय सौर 25 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध दशमी 23 क. 33 मि.
- पुनर्वसू नक्षत्र, 26 क. 13 मि. मिथुन चंद्र 20 क. 39 मि
- सूर्योदय 06 क. 48 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि.
दिनविशेष
1693 इंदूर राज्याचे संस्थापक श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा जन्म
1901 पद्मविभूषण, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर यांचा जन्म
1911 भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडला.
1936 प्रतिभावंत चित्रकार, कोरा कॅनव्हासचे लेखक प्रभाकर बरवे यांचा जन्म
1945 सावरकरांचे बंधू व क्रांतिकारक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांचे निधन
1946 कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध गायक अल्लादियाखाँ मुंबई येथे पैगंबरवासी झाले.