कर्क राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना परिश्रमातून सफलता संपादन करावी लागेल. चंद्र-हर्षल केंद्रयोगातून संयम अधिक लागतो. प्रार्थना, उपासना, सफलतेचा आधार होतो. परिचयात राहणारा मोठा परिवार त्यात उपयुक्त ठरेल.
कर्क राशी ड, ह आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
रविवार, दि. 17 मार्च 2019
- भारतीय सौर 26 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध एकादशी 20 क. 51 मि.
- पुष्य नक्षत्र 24 क. 11 मि., कर्क चंद्र
- सूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि.
- आमलकी एकादशी
दिनविशेष
1882 - आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
1909 - संस्कृत पंडित व भारत विद्यावंत रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म.
1910 - आदिवासींच्या कल्याणार्थ झटणाऱ्या अनुताई वाघ यांचा जन्म.
1937 - राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन.
1957 - फिलीपीन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आणि एक थोर मुत्सद्दी रेमन मॅगसेस यांचे निधन.
1961 - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म.
1990 - प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा जन्म.