Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 18 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 09:47 AM2019-03-18T09:47:00+5:302019-03-18T09:47:45+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
21 क. 46 मि. कर्क राशीची मुलं जन्मास येतील. त्यानंतर सिंह राशीत मुलांचा जन्म होईल. प्रारंभीच्या मुलांना प्रयत्नाने प्रगतीचा प्रवास निर्माण करावा लागेल. सिंह राशीच्या मुलांचे कार्यमार्ग गुरू-शनिच्या सहकार्यामुळे सोपे होतील, पदवी मिळेल.
कर्क राशी ड, ह
सिंह राशी म, ट आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, दि. 18 मार्च 2019
- भारतीय सौर 27 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध द्वादशी 17 क. 44 मि.
- अश्लेषा नक्षत्र 21 क. 46 मि., कर्क चंद्र 21 क. 46 मि.
- सूर्योदय 06 क. 46 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि.
- सोमप्रदोष
दिनविशेष
1869 - ब्रिटिश पंतप्रधान नेव्हील चेंबरलेन यांचा जन्म.
1881 - पत्रकार आणि नाटककार वीर वामनराव जोशी यांचा अमरावती येथे जन्म. त्यांचे पूर्ण नाव वामन गोपाळ जोशी असे होते.
1894 - भारताचे राष्ट्रीय नेते रफी अहमद किडवई यांचा जन्म.
1922 - महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास.
1938 - निर्माता व अभिनेता शशी कपूर यांचा जन्म.
1944 - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी युद्ध पुकारून बर्माच्या सीमारेषेत प्रवेष केला.
1948 - क्रिकेट खेळाडू एकनाथ सोलकर यांचा जन्म.
1965 - पार्श्वगायिका अलिशा चिनॉय हिचा जन्म.