वृश्चिक राशीत जन्माला येणारी आजची मुलं रवि, चंद्र त्रिकोणाचे सहकार्य घेऊन अनेक प्रांतात आगेकूच सुरू ठेवतील. समाज संपर्क, अधिकार, उद्योग त्यांची केंद्र असतील.
वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, दि. 25 मार्च 2019
- भारतीय सौर 04 चैत्र 1941- मिती फाल्गुन वद्य पंचमी 20 क. 00 मि.- विशाखा नक्षत्र 07 क. 03 मि., वृश्चिक चंद्र- सूर्योदय 06 क. 40 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.- रंगपंचमी
दिनविशेष
1904 - हिंदुस्थानात पहिला सहकार कायदा अस्तित्वात आला.
1906 - कादंबरीकार व लेखिका कुमुदिनी रांगणेकर यांचा जन्म.
1924 - प्रसिद्ध मराठी साहित्यिक म. पां. भावे यांचा जन्म.
1932 - प्रसिद्ध मराठी कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म.
1933 - खगोलशास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर यांचा जन्म.
1956 - ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक मुकुल शिवपुत्र यांचा जन्म.
1983 - अत्याधुनिक बोट सागरकन्या हिचे जलावतरण.
1993 - कवी मधुकर बाबूराव केचे यांचे निधन.