कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना गुरु-शनिचे सहकार्य मिळणार असल्याने चंद्र-हर्षल शुभयोगातून मुलं शिक्षणात आणि व्यवहारात चमकत राहतील. काही मुलं प्रतिष्ठेच्या आकर्षक उंचीवर पोहोचू शकतील.
कुंभ राशी ग, स आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, दि. 5 मार्च 2019
- भारतीय सौर 14 फाल्गुन 1940- मिती माघ वद्य चतुर्दशी, 19 क. 07 मि.
- धनिष्ठा नक्षत्र 15 क. 17 मि., कुंभ चंद्र - सूर्योदय 06 क. 56 मि., सूर्यास्त 06 क. 44 मि.
दिनविशेष
1910 - अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
1913 - किराणा घराणाच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगल यांचा जन्म.
1914 - नाटककार, समीक्षक, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे इंदूर येथे निधन.
1931 - सविनय कायदेभंग चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यात करार.
1968 - भाषातज्ज्ञ, संशोधक, लेखक नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर यांचे निधन.
1974 - दूरदर्शन अभिनेता हितेन तेजवानी याचा जन्म.
1985 - मराठी तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देवीदास दत्तात्रेय वाडेकर यांचे निधन.
1995 - अभिनेता जलाल आगा यांचे निधन.
1997 - ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे टपाल तिकीट प्रकाशित.