Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 11 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:23 AM2019-03-11T08:23:48+5:302019-03-11T08:36:32+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
मेष राशीत जन्मलेली आजची मुलं कर्तृत्ववान असतील. निर्धाराने आगेकूच करणारी प्रवृत्ती त्यामध्ये असते. रवि-चंद्र शुभयोगातून अनेक क्षेत्रांत अधिकारही मिळतील. चंद्र-शुक्र केंद्रयोगात प्रलेभनापासून दूर राहावे लागेल.
मेष राशी - अ, ल, ई आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, दि. 11 मार्च 2019
- भारतीय सौर 20 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शद्ध पंचमी 28 क. 44 मि.
- भरणी नक्षत्र 28 क. 10 मि., मेष चंद्र
- सूर्योदय 06 क. 52 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि.
दिनविशेष
1689 - छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन.
1886 - आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना डॉक्टर पदवी प्रदान.
1889 - पंडिता रमाबाईंनी मुंबईत शारदासदन ही विधवा तसेच कुमारिकांसाठी शाळा सुरू केली.
1915 - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म.
1957 - दक्षिण व उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक व समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.
1965 - प्रसिद्ध गुजराथी साहित्यिक गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धुमकेतू यांचे निधन.
1970 - लेखक व पेरिमेसन ही व्यक्तिरेखा अजरामर केलेले अर्ले स्टॅनले गार्डनर यांचे निधन.