Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 11 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 08:42 AM2019-07-11T08:42:17+5:302019-07-11T08:43:16+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेल्या मुलांचा संपर्क राहील. तुला राशीमध्ये आणि रवि नेपच्यून नवपंचम योगाशी प्रयत्न आणि प्रगतीची गणिते अचूक सोडवता येतील. अनेक विभागांत स्वत: चा ठसा उमटविता येईल.
तुला राशी र अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, दि. 11 जुलै 2019
भारतीय सौर, 20 आषाढ 1941
मिती आषाढ शुद्ध दशमी 25 क. 3 मि.
स्वाती नक्षत्र 15 क. 55 मि.
सूर्योदय 06 क. 9 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि.
दिनविशेष
1889 - मराठी कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचा जन्म.
1921 - समाजप्रधान कथा, कादंबऱ्यांचे लेखक, सामाजिक कार्यकर्ते जळगाव येथील 1984 च्या 58 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकरराव रामराव खरात यांचा जन्म.
1960 - अभिनेते राजेंद्रकुमार यांचे सुपुत्र अभिनेते कुमार गौरव यांचा जन्म.
1966 - पहिल्या भारतीय बोलपटाचे नायक मास्टर विठ्ठल तथा विठ्ठल रघुनाथ देसाई यांचे निधन.
2003 - कादंबरीकार सुहास शिरवळकर यांचे निधन.
2009 - कवी, गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन.