तुला राशीत 9 क. 54 मि. पर्यंत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर वृश्चिक राशीची मुलं असतील. अभिनव उपक्रम आणि विचारांत जिद्द ठेवून कार्यभाग साधणे मुलांचा धर्म राहील. त्याचे प्रतिसाद प्रतिष्ठेच्या प्रांतात उमटतील.
तुला राशी र अद्याक्षर वृश्चिक राशी न, य अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, दि. 12 जुलै 2019
भारतीय सौर, 21 आषाढ 1941
मिती आषाढ शुद्ध एकाशमी 25 क. 3 मि.
विशाखा नक्षत्र 15 क. 57 मि. तुला चंद्र 9 क. 54 मि.
सूर्योदय 06 क. 9 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि.
शयनी एकादशी, चातुर्मासारंभ, पंढरपूर यात्रा
दिनविशेष
1909 - फिल्म निर्माता, दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म.
1913 - लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म.
1961 - मुठा धरण फुटून पानशेतचा महाप्रलय.
1965 - प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू, समालोचक संजय मांजरेकर याचा जन्म.
1999 - प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राजेंद्रकुमार यांचे निधन.
2012 - सुप्रसिद्ध अभिनेते दारासिंग यांचे निधन.
2013 - दादासाहेब फाळके अवॉर्ड प्राप्त हिंदी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट खलनायक, चरित्र अभिनेते प्राण यांचे मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन.