वृश्चिक राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र, मंगळ गुरुच्या शुभयोगाचे मिळणारे सहकार्य, प्रयत्न, प्रगतीच्या समन्वयासाठी उपयुक्त ठरेल. त्यातून काही प्रांतात स्वत: चा ठसा उमटविता येईल.
वृश्चिक राशी न, य अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, दि. 13 जुलै 2019
भारतीय सौर, 22 आषाढ 1941
मिती आषाढ शुद्ध द्वादशी 24 क. 29 मि.
अनुराधा नक्षत्र 16 क. 27 मि. वृश्चिक चंद्र
सूर्योदय 06 क. 10 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि.
दिनविशेष
1892 - जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय संगीताच्या गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म.
1924 - अर्थशास्त्रज्ञ मार्शल आल्फ्रेड यांचे निधन.
1939 - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक प्रकाश मेहेरा यांचा जन्म.
1995 - कवयित्री आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पहिली भारतीय महिला पद्मश्री आशापूर्णा देवी यांचे निधन.
2000 - ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचे निधन. त्यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2009 - चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे निधन.