शून्यातून आपली कार्यविश्व उभी करणारी आजची मुले कुंभ राशीत जन्मास येतील. बौद्धिक प्रभाव शिक्षण ते व्यवहार यामध्ये प्रचिती येईल. चंद्र, शुक्र शुभयोग कलागुणांच्या विकासाचा आहे. चंद्र नेपच्यून युती असल्याने चटकन कशावर विश्वास ठेवू नये.
जन्मनाव ग, स अक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, दि. 27 मे 2019
भारतीय सौर, 6 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य अष्टमी 11 क. 16 मी.
शततारका नक्षत्र 16 क. 13 मि. कुंभ चंद्र
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 9 मि.
दिनविशेष
1935 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
1938 - कादंबरीकार, कवी, समीक्षक, साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा जन्म.
1957 - कॉपिराईट संबंधीचा कायदा पास.
1962 - माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांचा जन्म.
1964 - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन.
1994 - कोशकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन.
2002 - कोनेरू हंपी ही ग्रँडमास्टर किताब मिळवणारी सर्वात तरूण महिला ठरली.