वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले गजकेसरी योगामुळे प्रगल्भ विचारांची आणि यशस्वी कृती करणारी असतील. शिक्षणात पदवीने प्रचिती येईल. व्यवहार प्राप्तीने आकर्षक होतील. कला, संगीत कार्याशी संपर्क यावा.
जन्माक्षर ब व ऊ

- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, दि. 3 जून 2019
भारतीय सौर, 13 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य अमावस्या 15 क. 32 मि.
रोहिणी नक्षत्र 24 क. 5 मि. वृषभ चंद्र
सूर्योदय 07 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 12 मि.
दर्श सोमवती अमावस्या
दिनविशेष
1890 - प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बाबूराव पेंटर (बाबूराव कृष्णाजी मेश्री) यांचा कोल्हापूर येथे जन्म. कलामहर्षी म्हणून ते गौरविले जात.
1892 - कथालेखिका, आत्मचरित्रकार, बालसाहित्यकार आनंदीबाई शिवराम शिर्के यांचा जन्म.
1912 - उद्योगपती सोहराब गोदरेज यांचा जन्म.
1940 - महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या प्रसिद्ध वकिल इंदिरा जयसिंग यांचा जन्म.
1947 - भारत-पाकिस्तान फाळणीची घोषणा.
1956 - मराठी नाटककार, स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी यांचे अमरावती येथे निधन.