मिथुन राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-बुध नवपंचम योगामुळे विचारांनी वेगवान असतील. शिक्षण करतील. व्यावहारीक वर्तुळात स्वत: चा प्रभाव प्रस्थापित करू शकतील. माता-पित्यास शुभ
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 17 माघ 1941
मिती माघ शुद्ध द्वादशी 20 क. 24 मि.
आर्द्रा नक्षत्र, 25 क. 21 मि., मिथुन चंद्र
सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 23 मि.
प्रदोष
दिनविशेष
1915 - कवी, गीतकार, ए मेरे वतन के लोगो गीताचे रचनाकार प्रदीप तथा रामचंद्र नारायण द्विवेदी यांचा जन्म.
1931 - स्वातंत्र्यसेनानी मोतीलाल नेहरू यांचे निधन.
1932 - पहिला मराठी चित्रपट अयोध्येचा राजा प्रदर्शित.
1939 - बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे निधन.
1940 - पार्श्वगायक, संगीतकार भूपेंद्र सिंह यांचा जन्म.
1983 - भारतीय क्रिकेटपटू श्रीसंत याचा जन्म.
1988 - अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिचा जन्म.
2001 - माजी केंद्रीय मंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.